जळगाव

जळगाव ग. स. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त; सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती 

देविदास वाणी

जळगाव ः येथील जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग.स.सोसायटी)चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सोसायटीवर आता सहकार विभागाचे प्राधिकृत अधिकारी मंडळ (प्रशासक) नेमले असून आज त्यांनी पदभार स्वीकारला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी  दिली. 

गेल्या पाच महिन्यांपूर्वी संचालक मंडळाची मुदत संपलेल्या ग.स.सोसायटीतील सत्ताधारी, विरोधातील १४ संचालकांनी नुकतेच राजीनाम दिले. यामुळे ग.स.ची निवडणूक शासनाच्या आदेशानूसार काही महिन्यात घेतली जाणार आहे. 

ग.स. सोसायटीतील सत्ताधारी लोकसहकार गटाच्या पाच संचालकांनी विरोधी सहकार गटाला साथ देत अध्यक्ष मनोज पाटील यांच्याविरुद्ध बंड केले. दोन्ही गटाच्या १४ संचालकांनी २८ जानेवारीला राजीनामा दिला होता. सोसायटीच्या २१ पैकी १४ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष अल्पमतात आले होते. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी होती. 
ग.स.सोसायटीच्या १४ संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडून पडताळणी करण्यात आली. संबंधित संचालकांनी राजीनामे दिले असल्याचे समोर आल्याने ग.स.चे संचालक मंडळ बरखास्त झाले. 

आवश्य वाचा- राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींचा बिगुल वाजणार 

असे आहे प्राधिकृत अधिकारी मंडळ 
सहकार विभागाच्या प्राधिकृत मंडळामध्ये सहाय्यक निबंधक विजय गवळी, सहकार अधिकारी भाऊसाहेब महाले, लेखापरीक्षक प्रशांत विरकर यांचा समावेश आहे. प्राधिकृत अधिकारी मंडळातर्फ आजपासूनच ग.स.सोसायटीचा कारभार पाहण्यास सूरवात केली आहे. 
 

ग.स.सोसायटी १११ वर्षजूनी आहे. संस्थेचे ३८ हजार सभासद आहेत २४० कोटी ठेवी आहे. ८९२ कोटीचे कर्ज वाटप झालेले आहे. प्राधिकृत मंडळाने आज पदभार स्वीकारला असून नवीन संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत आम्ही कारभार पाहू. सभासदांची नियमित कामे सुरळीत होतील. 

विजय गवळी 
सहाय्यक निबंधक. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

SCROLL FOR NEXT