जळगाव

जवान सागर धनगर अनंतात विलीन; कुटुंबासह उपस्थितांचा अश्रूंचा बांध फुटला

आकाश धुमाळ

चाळीसगाव : शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांच्या निनादात जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर आज सकाळी दहा वाजेला त्यांच्या मूळ गावी तांबोळे ता. चाळीसगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.जवानांना शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांबोळे बुद्रुक येथील सागर रामा धनगर (वय 23) या जवानाचा मणिपूर येथे गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. आज सकाळी आठला त्यांच्या मूळगावी तांबोळे येथे जवानाचे पार्थीव आणण्यात आले. त्यानंतर गावातून फुलांनी सजलेल्या सैन्यदलाच्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. वंदे मातरम, जवान अमर रहे, अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

या वीर जवानाला शासकीय इतमामात गावापासून जवळच असलेल्या तांबोळे टेकडी येथे मोकळ्या जागेवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सागर धनगर यांच्या चुलत भाऊ देवेंद्र धनगर याने भावाच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री ठेंगे, सैन्य दलातील मराठा बटालियन चे सुभेदार संपत आमले, हवालदार रोहिदास पाटील व खानदेश रक्षक ग्रुप चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अग्निडाग देण्यापूर्वी जवान सागर धनगर यांना सैन्यदल व पोलिसांतर्फे हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली.

आवर्जून वाचा- हतनूर जलाशयात जैवविविधतेचा अभ्यास; ३०९ प्रजातींची नोंद 


तिरंग्याच्या रॅलीद्वारे अखेरचा प्रवास
जवान सागर धनगर यांची अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रेस सुरुवात झाली. अंतयात्रा याच्यापुढे तब्बल सत्तर फुटांचा तिरंगा धरलेले तरुण व त्यामागे अंतयात्रा लावणारे दृश्य पाहताना उपस्थितांना अक्षरशा गहिवरून आले.

मन सुन्न करणारा कुटुंबाचा आक्रोश
पहाटेपासूनच तांबोळे येथे गर्दी जमू लागली होती. गावात पार्थिव दाखल झालेे आणि कुटुंबासह गावकरी व उपस्थितांच्या अश्रूंचा बांधा फुटला.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT