Stone pelting at Raverla procession 10 to 12 people detained by police jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : रावेरला मिरवणुकीवर दगडफेक; 10 ते 12 जण ताब्यात

अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहरातून रविवारी (ता. २१) सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेवर कारागीरवाडादरम्यान दगडफेक झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहरातून रविवारी (ता. २१) सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेवर कारागीरवाडादरम्यान दगडफेक झाली. दगडफेकीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मिरवणूक तत्काळ बंद करून शहरही बंद झाले. (Stone pelting at Raverla procession 10 to 12 people detained by police jalgaon news)

पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एका गटातील दहा-बारा जणांना ताब्यात घेतले असून, शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी रात्री येथे भेट देत पाहणी केली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. स्थिती आता नियंत्रणात आहे.

येथे सायंकाळी पाचला महालक्ष्मी मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा प्रमुख मार्गावरून कारागीरवाड्याकडे आली.

तेथून वळणावर भोईवाडाकडे जात असतानाच मुस्कान पान सेंटरजवळच्या एका अरुंद बोळातून शोभायात्रेवर पाच-सहा युवकांनी दगडफेक केली. यामुळे मिरवणुकीत पळापळ झाली.

या वेळी महिलांसह सुमारे चार-पाच हजार भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. अवघ्या पाचच मिनिटात सर्वत्र पळापळ झाली.

दगडफेक होऊन काहीतरी अघटित झाल्याची चर्चा शहरात पसरताच संपूर्ण शहरातील दुकाने आणि व्यवहार पाचच मिनिटांत बंद झाले. मिरवणूक अर्धवट सोडून द्यावी लागली. अखेर काही कार्यकर्त्यांनी मोठ्या राम मंदिरात जाऊन आरती करून मिरवणूक पूर्ण केली.

दरम्यान, फैजपूर विभागाच्या पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रात्रीच दगडफेक केलेल्या गल्लीत शिरून काही युवकांना दगडांसह ताब्यात घेतले. यात अनेक जण बाहेरून कुलूप लावून आत लपून बसलेले संशयितही होते.

येथे नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी तत्परतेने व कठोरपणे परिस्थिती हाताळली व नियंत्रणात आणली. रात्री उशिरा पोलिसांनी ‘ऑपरेशन कोंबिंग’ करीत आणखी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT