दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक  sakal
जळगाव

पारोळा-अमळनेर बसवर दगडफेक

दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पारोळा-अमळनेर बसवर बुधवारी (ता. ८) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून बसचे नुकसान केले. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत चालक शांताराम नथ्थू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की अमळनेर आगारातून निघालेली बस (एमएच ४०, एन ९०८२) सकाळी साडेअकराला पारोळा येथे आली.

परत अमळनेरकडे जात असताना भोकरबारीपुढे दुपारी सव्वबाराच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी दुचाकीने बसचा पाठलाग करत समोरून बसवर चालकाच्या दिशेने दगडफेक करीत बसची काच फोडून पळ काढला. या वेळी चालक रवी पाटील यांना किरकोळ दुखापत झाली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवासी घाबरले होते. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संतोष भंडारे व त्यांच्या पथकाने भेट दिली व पंचनामा करून अज्ञात दोन जणांविरुद्ध सरकारी वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: नागपुरात सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांचा समर्थनात तरुणाई एकत्र

SCROLL FOR NEXT