Arrested suspects Rakesh Sapkale and Gopal Patil esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सुप्रीमच्या गेटवर रस्तालूट करणाऱ्या संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगिक वसाहत परिसरातील सुप्रीम कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर रिक्षाचालक गोपाल शिंदे मालवाहतूक रिक्षा घेऊन उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना बेदम मारहाण करून खिशातून पाकीट हिसकावून पळ काढला.

एमआयडीसी पोलिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Suspects of street looting at Supreme got arrested jalgaon crime news)

मुसळी (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी गोपाल एकनाथ शिंदे हे त्यांची मालवाहू रिक्षा घेऊन औद्योगिक वसाहत जळगाव येथे आले होते. सुप्रीम कंपनीच्या मेन गेटवर उभे असताना काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी शिंदे यांना काहीएक कारण नसताना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये काढून घेत पळ काढला. शिंदे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

निरीक्षक जयपाल हिरे यांच्या गुन्हेशोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून उपनिरीक्षक नीलेश गोसावी, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी संशयितांचा ठाव घेतल्यावर राकेश भीमराव सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी) व त्याचा साथीदार गोपाळ रवींद्र पाटील (रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी) अशा दोघांना ताब्यात घेतले.

त्यांनी गुन्ह्याची कुबली दिली. त्यांना न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, संशयितांकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT