topic of Pachora Bazar Committee seat was discussed in session jalgaon esakal
जळगाव

Jalgaon News : पाचोरा बाजार समितीच्या जागेचा विषय अधिवेशनात गाजला : आमदार किशोर पाटील आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जळगाव पीपल्स बँकेकडे थकीत कर्ज पोटी तारण असलेल्या जागा विक्रीचा विषय नागपूर हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला.

आमदार किशोर पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीच्या आधारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.(topic of Pachora Bazar Committee seat was discussed in session jalgaon news)

कृषी उत्पन्न बाजार समितीने २००८ मध्ये जळगाव पीपल्स बँकेकडून कर्ज घेतले होते. २०१२ नंतर कर्जाचे हप्ते फेडण्यात अनियमितता आली. त्यामुळे कर्ज व त्यावरील व्याजाचे आकडे वाढत गेले. बँकेने समितीच्या आवारातील सुमारे वीस कोटी रुपये किमतीची जागा लिलावाद्वारे विक्री काढली.

त्याचे सरकारी मूल्य ९ कोटी असताना कवडीमोल भावात या तारण जागेचा व्यवहार झाला. जागा विक्रीची जाहिरात मुंबई परिसरातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली. हे प्रकरण कर्ज वसुली न्यायाधिकरणात (डीआरटी) नेले. ही जागा विक्री होऊ नये यासाठी ‘डीआरटी’कडे अपील करून जागा विक्री थांबवण्याची मागणी केल्यानंतर विक्री व्यवहारास स्थगिती मिळाली.

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे हा विषय मांडल्यानंतर त्यांनी पाच कोटी कर्ज देण्याची तयारी दर्शवली. ही प्रक्रिया सुरू असताना जागा खरेदीदाराने बाजार समिती आवारात जागा ताब्यात घेतल्याबाबतचे फलक बुधवारी सकाळी लावले. हा विषय आमदार किशोर पाटील यांनी बुधवारी दुपारच्या सत्रात विधानसभा अधिवेशनात मांडला.

शेतकऱ्यांची जागा मातीमोल किमतीत विक्री झाल्याचे स्पष्ट करत एका मंत्र्याच्या दबावाखाली तहसीलदारांनी ५० लाख रुपये घेऊन तारण जागेचा ताबा दिल्याने त्यांना निलंबित करावे, अशी भूमिका आक्रमकपणे मांडली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याला उत्तर देताना या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई होईल.

तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निलंबित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, जागा खरेदी केलेल्या यंत्रणेकडून बाजार समिती आवारात जागा ताब्यात घेण्याबाबतचे लावलेले डिजिटल फलक ‘जैसे थे’ आहेत.

''बाजार समिती आवारातील शेतकऱ्यांची कोट्यवधींची मालमत्ता मातीमोल भावात विक्री झाल्याने ही जागा वाचवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मी शेतकरी व लोकप्रतिनिधी असल्याने शेतकरी हिताची जागा वाचवणे माझे कर्तव्य आहे. बाजार समितीची एक इंचही जागा विकू देणार नाही, असा शब्द मी जाहीर सभेत दिला होता. बाजार समितीला नफ्यात आणून बँकेची कर्जफेड करू.''- किशोर पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT