Ghulam Rasool Mujjakir Pinjari esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दोघा आरोपींना 7 वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीला धमकी देत चोपड्यातून अमळनेरला पळवून आणणाऱ्या दोघांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.(Two accused sentenced to 7 years for abducting girl jalgaon crime news)

चोपडा येथील एक अल्पवयीन मुलगी ६ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी पावणेसातच्या सुमारास शाळेत जात असताना गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (रा. मिल्लतनगर, चोपडा) याने तिला धमकी दिली आणि त्याच्यासोबत येण्यास सांगितले. ‘जर तू येणार नाही तर तुझे आणि माझे प्रेमसंबंध आहेत आणि लग्न झाले आहे, असेही सांगेल’, अशी धमकी देऊन पीडित मुलीला तो बसने अमळनेर घेऊन आला.

तेथून त्याने त्याचा मित्र शेख मुज्जकिर हमीद पिंजारी (रा. मण्यारअळी, चोपडा) याला फोन लावून बोलावून घेतले. दोघे जण पीडित मुलीला गांधलीपुरा भागात मुस्लिम वस्तीत घेऊन गेले. काही हिंदू मुलांनी मुस्लिम मुलांसोबत हिंदू मुलगी पाहिली म्हणून तणाव किंवा अनर्थ होऊ नये म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले.

पोलिस येताच गुलाम रसूल पळून गेला. पोलिसांनी पीडितेच्या पालकांना बोलावले. चोपडा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध पोस्को आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी तपास करून दोघा आरोपीना अटक केली होती. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता.

ॲड. राजेंद्र चौधरी यांनी युक्तिवाद करून अकरा साक्षीदार तपासले. रिक्षाचालक, गांधलीपुरा भागातील प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्या. पी. आर. चौधरी यांनी आरोपीना सात वर्षांची शिक्षा सुनावली.

तसेच १०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून सहा उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलिस नाईक हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, अतुल पाटील यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT