Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon News : वाळूची अवैध वाहतूक ; 2 ट्रॅक्टर जप्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नदीपात्रातून वाळूची (Sand) अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले असून, ट्रॅक्टरमालकासह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Two tractors seized for illegal transport of sand Jalgaon News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नदीपात्रातून वाळूउपशाला बंदी असताना, वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. शहरातील शंभूराजे हिल्स पॉइंटजवळून वाळूची वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर शनिवारी (ता. २५) सकाळी अकराच्या सुमारास रामानंदनगर पोलिसांनी पकडले.

चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नव्हता. दरम्यान, पथकाने एक लाख दोन हजार रुपयांचे ट्रॅक्टर व वाळू जप्त केली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पोलिस कर्मचारी रवींद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र बाबूराव सोनवणे (वय ४९, रा. मोहाडी, ता. जळगाव) व मनोज बाळकृष्ण चौधरी (रा. नयनतारा गेस्ट हाउससमोर, मोहाडी रोड, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रेवानंद साळुंखे तपास करीत आहेत.

रामेश्वर कॉलनीतून ट्रॅक्टर जप्त

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून विनाक्रमांकाचे वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर एमआयडीसी पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत दोन लाख ५३ हजार रुपये आहे. ट्रॅक्टरमधील वाळूही जप्त केली आहे. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून रवींद्र शिवाजी आटोळे (वय २२, रा. धानोरा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक हेमंत कळसकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT