Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गाणे बदलविल्याने तरुणावर चाकूने हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : म्हाडा कॉलनीत हळदीच्या कार्यक्रमात सुरू असलेले गाणे बदलविले, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट तरुणाला चाकूने भोसकण्यात झाले.

या वादात एका २३ वर्षीय तरुणास गंभीर जखमी झाला. सचिन भरत महाले (रा. योध्यानगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. (young man attacked with a knife Jalgaon Crime News)

बुधवारी (ता. ७) रात्री सचिन महाले मित्रांसोबत म्हाडा कॉलनीत हळदीच्या कार्यक्रमाला आला होता. कार्यक्रमात सुरू असलेले गाणे बदलविण्यास सचिन याने सांगितले. याचा राग येऊन तीन तरुणांनी त्याच्याशी वाद घातला.

त्यातील दोघांनी हातात दगड घेऊन सचिनला मारले, तर तिसऱ्याने खिशातून चाकू काढून त्याच्या छातीत भोसकून गंभीर जखमी केले.

‘पोलिसांत तक्रार दिली, तर यापेक्षाही जास्त मारू’, अशी धमकी दिली. सचिन याने उपचार घेतल्यानंतर गुरुवारी (ता. ८) दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT