Fraud esakal
जळगाव

पोर्टलवर जॉब शोधणे महागात; तरुणीला अडीच लाखाला गंडविले

तरुणीने पैसे भरल्यानंतर काही दिवसांनंतर तरुणीला जॉब लेटरही मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘इंडिया जॉब’ या पोर्टलच्या माध्यमातून नोकरीच्या शोधार्थ असलेल्या तरुणीची अडीच लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हापेठ पोलिसात तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. विविध माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले असून दररोज हे प्रकार समोर येत आहेत.

असा घडला प्रकार
शहरातील टागोरनगरातील रवीना कैलास बावणे ही तरुणी २६ मे रोजी गुगलवर जॉब शोधण्यासाठी सर्च करत असताना इंडिया जॉब पोर्टलवर नर्सिंग पोस्टसाठी तिला व्हॅकन्सी दिसून आली. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिने संपर्क साधून नोकरीबद्दल विचारपूस केली. फोनवरील महिलेने संबंधित व्हॅकन्सीची माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची मागणी केली आणि नोकरीसाठी सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च येईल, असे देखील सांगितले. त्यानंतर महिलेने रवीना हिचे विश्वास संपादन करून तिच्याकडून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकूण २ लाख ६० हजार रुपये उकळले.



बनावट ‘जॉब लेटर’

तरुणीने पैसे भरल्यानंतर काही दिवसांनंतर तरुणीला जॉब लेटरही मिळाले. पण, काही दिवसांनी हे लेटर बनावट असल्याचे लक्षात आले. अखेर रवीनाने १३ जूनला संबंधित महिलेला फोन केला आणि पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, पैसे परत न मिळाल्यामुळे अखेर तरुणीने गुरूवारी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT