काही सुखद

दाढीचे पैसे बचत करून कॅन्सरग्रस्तांना दिले १० हजार

सकाळवृत्तसेवा

वारणानगर - येथील कॅन्सर फाउंडेशनतर्फे ‘नो शेव्ह नोव्हेंंबर’ हे अभियान महिनाभर राबवून यातून दाढीचे बचत केलेले पैसे ‘एक हात कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी’ या उपक्रमाद्वारे जमा केले. यातून रंगराव बापू सांगले (शहापूर), संतोष पांढरे (कोडोली, ता. पन्हाळा) या कॅन्सरग्रस्त दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली.

येथील हॉटेल त्रिवेणीच्या सभागृहात कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, केखले प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, उद्योजक विशाल जाधव याच्या हस्ते कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदत दिली.

कॅन्सर फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या मदतीतून रुग्णांना आधार निर्माण झाला असून या उपक्रमास भविष्यात चांगला प्रतिसाद मिळून अनेक रुग्णांना मदत होणार असल्याचे श्री. झाडे, श्री. पाटील, श्री. जाधव यांनी सांगितले. या वेळी प्राजक्ता चव्हाण, प्रफुल्ल कावळे, अक्षय डोंबे, अनिल बुवा, धनराज पाटील, धीरज पाटील, विनोद महापूरे, राहुल पाटील, ओमकार जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

३७० रुपयांची बिर्याणी, प्रेतांच्या गुप्तांगांवर विनोद... प्रणित मोरे, हिमांशू आणि डॉ. सेजलवर गुन्हा दाखल; कोणती कलमे लावली?

Tukaram Mundhe Video: ''..त्यांनी माझा इतिहास बघावा, मग धमकी देण्याच्या भानगडीत पडावं'', तुकाराम मुंढेंचा इशारा; व्हिडीओ व्हायरल

Pali News : छायाचित्रणाचा आनंद घ्या, पण ड्रोन उडवून पक्ष्यांचा जीव धोक्यात घालू नका; शंतनू कुवेस्कर यांचा डॉक्युमेंट्रीतून संवर्धनाचा संदेश

SCROLL FOR NEXT