5 thousand 500 was recovered as penalty in guhagar 
कोकण

विनामास्क फिरणाऱ्यांना चांगलाच दणका 

मयुरेश पाटणकर

गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने कोरोना लढ्यात आता कडक पाऊले उचलली असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शनिवारच्या आठवडा बाजारात 11 व्यक्तींकडून दंडापोटी 5 हजार 500 रुपयांची वसुली करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने येथील शनिवारचा आठवडा बाजार काही अटी व शर्तींच्या नियमानुसार सुरू केला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी यांनी विशेष लक्ष दिले आहे. यापूर्वी आठवडा बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. शहरातून फिरणाऱ्या घंटागाडीवरूनही कोरोना संकटातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीदेखील आठवडा बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने दंड वसुलीला सुरवात केली आहे. त्याचा फटका तालुक्‍यातून आठवडा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना बसला. आठवडा बाजारातील 11 जणांवर कारवाई करत दंडात्मक वसुली करण्यात आली. या कारवाईचा परिणाम लगेचच जाणवू लागला. शृंगारतळी बाजारपेठेत मास्कशिवाय फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

मार्चपासून कोरोना विरोधातील लढाईत पाटपन्हाळेतील ग्रामस्थांसह तालुकावासीयांनी ग्रामपंचायतीला सहकार्य केले होते. अजूनही कोरोना देशातून हद्दपार झालेला नाही. त्यामुळे मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे आहे.या कारवाईच्या निमित्ताने ग्रामपंचायतीची अशी भूमिका मांडली. 
 
कोणावरही कारवाई करताना वाईट वाटते. परंतु सर्वांनीच सर्वांचे आरोग्य उत्तम रहाण्यासाठी मास्क वापरावा, सामाजिक अंतराचे भान ठेवावे जेणेकरून गुहागर तालुका कोरोनामुक्त राहील.

 -संजय पवार, सरपंच 
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT