कोकण

शिरशिंगे - शिवापुर रस्त्यासाठी २६ जानेवारीला उपोषणचा इशारा

अमोल टेंबकर

सावंतवाडी - मोर्ले पारगड रस्त्याप्रमाणेच सावंतवाडी व कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा शिरशिंगे - शिवापुर हा रस्ता केवळ वनविभाग आणि बांधकामाच्या अधिकार्‍यात  समन्वय नसल्यामुळे रखडला आहे 

दरम्यान 26 जानेवारीपूर्वी या रस्त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव दिल्ली दरबारी पाठवा आणि रखडलेले काम तात्काळ सुरू करा, अन्यथा कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा आज दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक  बांधकाम विभागाला दिला आहे 

याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता देण्यात आले याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती रवी मडगावकर यांनी दिली. ते म्हणाले, शिरशिंगे येथून शिवापूरला जाणारा चार किलोमीटरचा रस्ता हा शिवकालीन आहे यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी या मंजूर करण्यात आला होता. रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु ते वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जमिनीत येत असल्याचे कारण पुढे करून हे काम रोखण्यात आले.

ज्याप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले पारगड रस्त्याची परिस्थिती झाली त्याची अवस्था या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे हे काम चुकीच्या पद्धतीने थांबवण्यात आले. आज या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेण्यात आली या 26 जानेवारीपूर्वी हे काम सुरू करण्यासंदर्भात आवश्यक असलेला प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा 26 जानेवारीला सावंतवाडी येथील बांधकाम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, मोहन सावंत, रवी मडगावकर, पंढरीनाथ राऊळ, सुरेश शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

वनविभागाकडून कायद्याचा बाऊ  

हा रस्ता शिवकालीन आहे. रस्त्याच्या जागेसाठी व्यापली जाणारी जमीन ही वनसंज्ञा म्हणून लागली आहे. मात्र ती जमीन वन विभागाची असल्याचे सांगून वन अधिकारी कायद्याचा बाऊ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बांधकाम विभाग खतपाणी घालत आहे.

- रवी मडगावकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT