bear attack sakal
कोकण

अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर

तळसर येथील घटना, कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यातील तळसर येथील जंगलामध्ये अस्वलाने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाला.बाबू आबा ढेबे (वय ४०) असे जखमीचे नाव असून, त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी ही घटना घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाबू ढेबे हे बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये गुरे चरविण्यासाठी गेले होते. याच वेळी अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ते बेसावध असतानाच हा हल्ला केला.

त्यांच्या दोन्ही हातांना अस्वलाने फाडले आहे. तसेच पोटामध्ये गंभीर जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर व ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ शिरगाव येथील रुग्णालयात नेले. तसेच अधिक उपचारासाठी कामथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती तळसरचे पोलिसपाटील महेश कदम यांना देण्यात आली. यानंतर वनविभागालाही माहिती कळविण्यात आली असून, वनविभागाचे कर्मचारी जखमी बाबू ढेबे यांची माहिती घेण्यासाठी कामथे रुग्णालयात दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT