कोकण

गावठी 'बाॅम्ब' पेरल्याप्रकरणी कानूर येथील दोघे ताब्यात 

अमोल टेंबकर

आंबोली - डुक्कर मारण्याचे तब्बल 50  गावठी बॉम्ब रस्त्याच्या बाजूला पेरणाऱ्या कानुर येथील दोघा संशयितांना पकडण्यात आले.  पुणे येथील पर्यावरण अभ्यासक डाॅ. राजीव सिन्हा त्यांच्या जागरूकीमुळे हा प्रकार उघड झाला आहे.  त्यांनी त्या दोघांना पकडून पोलिस व वनविभागाच्या स्वाधीन केले. 

हा प्रकार काल सायंकाळी सहा वाजता घडला. मात्र आता गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू करण्यात आली आहे. त्या दोघा संशयितांनी आंबोली फौजदारवाडी येथील जंगल परिसरात रस्त्याच्या गटारात तब्बल 50 गावठी बॉम्ब पुरून ठेवले होते. हा प्रकार सिन्हा यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना हटकले. परंतु आपण अडकले जाऊ या भीतीने त्या दोघा संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यास सिन्हा यांना यश आले आहे. पोलीस व वनविभाग यांनी दोघांनी मिळून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सिन्हा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?

प्रभासच्या 'फौजी' चित्रपटात झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; सध्या गाजवतोय झी मराठीची मालिका, पाहून प्रेक्षक खुश

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

SCROLL FOR NEXT