Central Railway has started Dadar Sawantwadi Tutari Special Express 
कोकण

कोकणातील प्रवाशांवर अन्याय : तुतारी एक्‍स्प्रेस सावंतवाडीपर्यंतच

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : मध्य रेल्वेने दादर-सावंतवाडी तुतारी विशेष एक्‍स्प्रेस सुरू केली आहे. त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे; मात्र कोकणवासीयांच्या हक्काची सावंतवाडीपर्यंत धावणारी तुतारी विशेष एक्‍स्प्रेसला प्रवासी मिळत नसल्याच्या कारणावरून मडगावपर्यंत सोडण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न असल्याने त्यापूर्वीच कोकण समन्वय समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


कोकण मार्गावरून गोवा, मंगलोर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या बंद आहेत. त्यामुळे या मार्गावर धावणारी दादर-सावंतवाडी तुतारी विशेष एक्‍स्प्रेस सावंतवाडीऐवजी मडगावपर्यंत पुढे नेण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. सावंतवाडीतून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याचा कोकण रेल्वेचा प्रयत्न आहे; मात्र याला कोकणातील प्रवासी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मडगावपर्यंत सेवा देण्याच्या नावावर कोकणातील प्रवाशांवर अन्याय होण्याची शक्‍यता कोकण समन्वय समितीने व्यक्त केली आहे.

त्यामुळे मध्य रेल्वेने याप्रकारे निर्णय घेतल्यास सर्व प्रवासी संघटना आणि सामान्य जनतेचा या प्रस्तावाला विरोध असेल, असा इशाराच कोकणातील प्रवासी संघटनांनी दिला आहे. मध्य रेल्वेने तुतारी विशेष गाडी मडगावला नेण्याचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी; अन्यथा कोकणची ग्राममंडळे, तालुका मंडळे, जिल्हा मंडळे, सामाजिक आणि शैक्षणिक संघटना मिळून कोरोनाच्या काळातही तीव्र  आंदोलनाच्या तयारीत आहेत.

‘‘इतर कोविड विशेष गाड्यांच्या तुलनेत तुतारीला समाधानकारक प्रवासी संख्या आहे. ३ ते ५ ऑक्‍टोबरदरम्यान सरासरी ९० टक्के प्रवासी भारमान होते. नवरात्रोत्सवासाठीही आरक्षण सुरू आहे. त्यामुळे तोटा कमी करायचा असल्यास एसी डबे कमी करावेत व गाडीला काही तात्पुरते अतिरिक्त थांबे द्यावेत. त्यामुळे कोकणातील प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल. ’’
- यशवंत जड्यार, सरचिटणीस, वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT