यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच रेल्वे गाड्यातील जनरल आरक्षण रद्द करण्यात आले.
कणकवली : गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने २२४ गाड्या सोडल्या. तर सुमारे दीडशे एसटी बसेसमधून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले होते. तसेच आपापली खासगी वाहने घेऊनही चाकरमान्यांनी सिंधुदुर्ग गाठले होते. गौरी - गणरायांना निरोप दिल्यानंतर हे चाकरमानी मुंबईला रवाना होत आहेत.
सिंधुदुर्गातून आज मुंबईच्या दिशेने दुपारपर्यंत ‘मडगाव सीएसटीएम’ अशा दोन गाड्या, ‘सावंतवाडी सीएसटीएम’, ‘पनवेल-सीएसएटीएम’, ‘मडगाव ते हापा’, ‘करमळी-सीएसटीएम’ आणि ‘कुडाळ-बांद्रा टमिर्नस’ अशा गणेशोत्सव विशेष गाड्या रवाना झाल्या. याखेरीज सावंतवाडी-दिवा, मांडवी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसमधून चाकरमानी मुंबईला रवाना झाले. सायंकाळी आणखी तीन गणेशोत्सव विशेष फेऱ्यांसह कोकणकन्या, तुतारी, मंगलोर या एक्स्प्रेस गाड्या सुटणार आहेत.
यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच रेल्वे गाड्यातील जनरल आरक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे जेवढ्या सीट तेवढेच आगावू आरक्षण चाकरमान्यांनी बुकिंग गेले होते. यात कुठल्याही रेल्वे गाडयांमध्ये जादा प्रवाशांची गर्दी नाही. तसेच यंदा रेल्वे मार्ग सुरळीत असल्याने चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास सुखकर झाला आहे. तसेच वैभववाडीच्या पुढील स्थानकापासून होणारी प्रवाशांची अफाट गर्दी आणि त्यातून होणारे वादंगाचे प्रकार देखील यंदा टळले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच रेल्वे स्थानकांवर केवळत आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे. यामुळे रेल्वे स्थानकात होणारी अवांतर गर्दी टळली आहे. याखेरीज रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व स्थानकांमध्ये पोलिस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.
एसटीच्या १४७ गाड्यांचे आरक्षण फुल्ल
रेल्वे बरोबरच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या गाड्यांनाही प्राधान्य दिले असून १४७ बसेसचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. यात आज (ता.१७) जिल्ह्याच्या विविध आगारातून ३६ बसेस मुंबईला रवाना झाल्या. जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांनी २३ सप्टेंबर पर्यंत मुंबईला जाण्यासाठी बसेस बुक केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.