chiplun  sakal
कोकण

Chiplun : चिपळूणात प्रांत कार्यालयावर मोर्चा

कोकण समन्वय समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

सकाळवृत्तसेवा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे होणारे चौपदरीकरण पूर्णत्वास जात नसल्याने नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. या प्रश्नासंदर्भात मंगळवारी कोकण समन्वय समितीने निषेध करत मोर्चा काढला. शहरातील बहादूरशेख नाका येथून प्रारंभ झालेल्या या मोर्चादरम्यान काळे झेंडे घेऊन हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला.

या वेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असून पावसाळ्यात महामार्ग खड्डेमुक्त व्हावा, धोकादायक वळणे व घाटमार्ग शक्य तितके सोपे करावेत, महामार्गाच्या भरावासाठी डोंगर पोखरु नये, हायवेचे जंक्शन मुख्य रस्त्यावर येऊन मिळत असल्याने अशा ठिकाणी सुरक्षिततेसाठी ब्रिज, अंडरपास सीसची व्यवस्था हवी. लोटे परशुराम, पोलादपूर, संगमेश्वर येथील बाजारपेठेचा प्रश्न सोडवावा.

सुरक्षितेच्या दृष्टीने शक्य असतील ते सर्व बदल केले जावेत. यासाठी एक समिती स्थापन करावी, अशा मागण्या केल्या आहेत. या वेळी श्रीपाद चव्हाण, शिरीष काटकर, मिलिंद कापडी, राम रेडीज, संजय तांबडे, तुषार गोखले, प्रसाद सागवेकर, रूपेश घाग, प्रवीण पाकळे, अजय महाडीक, शरद शिगवण, जगदीश वाघुळदे, अमोल शिरधनकर, निखिल पाटील, सुधीर भोसले, बुवा चव्हाण, निर्मला जाधव, वैशाली विचारे, प्राजक्ता सरफरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SC Classification : शासकीय वसतिगृह प्रवेश जाहिरातीत एससी प्रवर्गाची विभागणी; नव्या वादाला फुटले तोंड, राज्यात उपवर्गीकरण लागू?

जुहूतील आलिशान घर ते लक्झरी कार! श्रद्धा कपूरची संपत्ती ऐकून थक्क व्हाल! तब्बल'इतक्या' कोटींची आहे मालकीन

FIFA WORLD CUP 2026: अमेरिकेचा दबदबा! पॅराग्वेचा फडशा; ९६ वर्षांत न झालेला चमत्कार झाला... कॅनडाने कसाबसा पराभव टाळला

Pune Crime: पुण्यात MBBS प्रवेशाच्या नावाखाली ४० जणांना गंडा, लाखोंची फसवणूक; ऑर्थर रोड जेलमधून आरोपी ताब्यात

Monsoon El Nino Impact : विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात अलनिनोचा प्रभाव तीव्र; मॉन्सूनवर परिणाम, हवामान विभागाने व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT