भाजपची महावितरणवर धडक sakal
कोकण

चिपळूण : भाजपची महावितरणवर धडक

पूर काळातही चिपळुणात अखंड विजेची मागणी; निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : शहारातील वीजपुरवठ्याविषयी निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत सोमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरण कार्यावर धडक दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करताना मुरादपूर येथील सबस्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसते. त्यामुळे पूरपरिस्थितीत शहरातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यासाठी येथे पर्यायी उपाययोजना करण्याची प्रमुख मागणी निवेदनाद्वारे केली. याबाबतचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षितकुमार वाकोडे यांना देण्यात आले आहे.

महावितरणकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, काही कामे केली जात आहेत. परंतु, महावितरणविषयी शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याविषयी भाजपने शहराध्यक्ष आशिष खातू यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत समस्यांचा पाढा वाचण्यात आला. शहरातील तिन्ही केंद्रांवर तक्रार निवारणासाठी २४ तास फोन उपलब्ध करावा, त्याची माहिती नागरिकांना देण्यात यावी, महावितरणचे अधिकारी व अभियंता हे वेळेत फोन उचलत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. नागरिकांना वीजपुरवठाबाबतची नेमकी माहिती मिळत नाही, तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन उचलण्याची सूचना देण्यात यावी, आदी मागण्या केल्‍या. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाकोडे यांनी मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहर चिटणीस विनायक वरवडेकर, दीपा देवळेकर, राम शिंदे, परेश चितळे, प्रभंजन पिंपूटकर, निखिल कील्लेकर, प्रणय वाडकर, आशिष जोगळेकर, सुधीर पानकर, जतिन घटे, उल्हास भोसले, आमिर बाचीम, मंदार कदम, अमेय सुर्वे, शीतल रानडे, उपेंन्द्र बर्वे आदी उपस्थित होते.

विविध मागण्या अशा..

शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा तसेच मुरादपूर सबस्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसते. परिणामी, येथून शहरात वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे येथे योग्य उपाययोजना करावी. मुरादपूर सबस्टेशनला जाणारा रस्ता करण्यात यावा. शहरासाठी असलेली ३३ केव्ही वीज पुरवठा लाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर बदलण्यात यावी तसेच पावसाळ्याच्या कालावधीत अत्यावश्यक यंत्रणेची तयारी ठेवावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉन्सूनची चाल मंदच, राज्यात 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

Abhijit Dipke: आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा म्हणणं समजून घ्या, देशात आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : अभिजित दिपके

Petrol Excise Duty: पेट्रोल स्वस्त होणार? सरकारकडून उच्च इथेनॉल पेट्रोलवरील कर माफ; पण E30 मुळे वाहनधारकांची चिंता वाढणार?

Vaibhav Sooryavanshi: मुलासाठी विकली वडिलोपार्जित जमीन; आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ऐकून तुम्हीही भावुक व्हाल...

Smart Prepaid Meter : लाईटबिल भरण्याची कटकट संपवा! ५०० रुपयांच्या रिचार्जवर किती दिवस चालतो स्मार्ट प्रीपेड मीटर? पैसे वाचवणार

SCROLL FOR NEXT