Corona patients are on the rise in the country but read what is happening in Ratnagiri 
कोकण

देशात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत, पण रत्नागिरीत काय होतय वाचा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्ण वाढत असताना रत्नागिरी  जिल्ह्याला मोठा दिलासा देणारी बाब पुढे आली आहे.  कोरोना संदर्भातील 12 अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. यामध्ये साखरतर येथील दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  एकूण प्रलंबित 68 अहवालापैकी 52 अहवाल प्राप्त झाले आहेत, ते सर्व निगेटिव्ही आहेत. यात कामथे रुग्णालयातील 10 अहवालाचा  समावेश आहेत.

जिल्हा प्रशासनाने आज सकाळी याची अधिकृत माहिती जाहीर केली. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचा विळखा ढिला होत चला असल्याची समाधानाची बाब पुढे आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारा तपासणी अहवाल काल (21) रात्री उशिरा प्राप्त झाले. यात साखरतर येथे प्रारंभी पॉझिटिव्ह निघालेल्या दोन  रुग्णांचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. मोठा दिलासा देणारी ही माहिती आहे. एवढेच नाही तर यासोबतच कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दहा रुग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.

18 अहवालाची प्रतीक्षा
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील चाळीस रुग्णांचे तपासणी अहवाल पाठविण्यात आले होते. आज सकाळी त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व अहवाल निगेटिव आलेले आहेत.
यामुळे एकूण प्रलंबित 68 अहवालांपैकी 52 अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले असून हे सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. प्रशासनाला आता 18 अहवालाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT