Crime sakal
कोकण

Crime: चाकूचा धाक दाखवून झोपलेल्या महिलेला लुटले

सकाळ डिजिटल टीम

Crime: रात्रीच्या वेळी राहत्या घरी जबरदस्ती शिरून महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सोमवारी (ता. ४) मध्यरात्री १ च्या सुमारास घडला. चोरीनंतर दरोडेखोरांनी महिलेला घरातच डांबून ठेवून पोबारा केला. माणगाव तालुक्यातील इंदापूरजवळील मौजे कलानगरमध्ये हा प्रकार घडला असून या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची फिर्याद अंकिता अरुण मांगले (वय ३०) यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. सोमवारी रात्री फिर्यादी अंकिता मांगले जेवण करून आपल्या घरी झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री १ च्या सुमारास दोघांनी आतून कडी लावलेला दरवाजा जबरदस्तीने ढकलून उघडला. दोन्ही चोरांनी तोंड पूर्णपणे बांधले होते.

त्यामुळे त्यांची ओळख पटवता आली नाही. एका चोराने अंकिता यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच तोंड दाबून ‘तू चूप बैठ’ असे बोलून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी दुसऱ्या चोराने कपाटाचे कुलूप तोडून त्यातील तीन लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने काढून घेतले. त्यानंतर दोघांनीही अंकिता यांना घरात डांबून तेथून पोबारा केला.

घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश अस्वार पुढील तपास करत आहेत. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT