बाळासाहेब ठाकरें, नरेंद्र मोदी Google
कोकण

बाळासाहेब ठाकरेंमुळे नरेंद्र मोदींना अभय मिळाले; जाधवांचे टिकास्त्र

जिल्हा बँक निवडणूक ; सर्व २१ जागा लढवणार

नागेश पाटील -सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वपक्षीय सहकार पॅनेल विरोधात राष्ट्रवादी चिपळूण तालुकाध्यक्ष जयद्रंथ खताते यांनी बडाचे निशान उभारले आहे. रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत सहकार पॅनेल विरोधात बंड थोपटणार असे सांगत सर्वच्या सर्व २१ जागांवर उमेदवार उभे करणार आणि सर्व सामर्थ्यानीशी ही निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली. खताते यांच्या या पावित्र्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना दणका मिळाला असून आता निवडणूक होण्याची लक्षणे आहेत.

पत्रकार परिषदेत जयंद्रथ खताते म्हणाले, चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. तरीही बँकेसाठी पॅनेलमध्ये उमेदवारी देताना तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. तालुक्यात अनेक पदाधिकारी इच्छुक असताना त्यांना विचारणा झाली नसल्याने नाराजीचा सुर मांडताना जयद्रंथ खताते म्हणाले, पक्षाचे आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, दादा साळवी आदींनाही विश्वासात घेतलेले नाही. या सर्वाना डावलून झालेल्या पॅनेलचा आम्ही निषेध करत आहोत. या पॅनेलविरोधात आम्ही बँकेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असून त्याची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खताते यांनीच स्वपक्षाच्या नेत्यांवर तोफ डागत बँकेत मनमानी धोरण सुरू असून त्याविरुद्ध खदखद असल्याचे सांगितले. ज्यांना वेगवेगळी पदे दिली. त्यांनाच पुन्हा बँकेच्या संचालकपदी संधी देण्यात आली आहे. तालुक्यात अनेक महिला इच्छुक असताना त्यांना साधी विचारणा केली नाही. नवख्या लोकांना दिलेल्या संधीचे गमक कार्यकर्त्याना कळले नाही. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांच्या नावाखाली पॅनेल काढायचे. त्यात आपल्याच लोकांना संचालक पदाची संधी द्यायची. शेतीपेक्षा कारखानदारांचे हित बँकेकडून जपले जात आहे, अशा धोरणा विरोधात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद असून ती सध्या व्यक्त होत आहे. यासाठी आम्ही बँकेची निवडणूक लढवणार आहोत. २१ जागासाठी उमेदवार दिले जातील. तशी तयारी करीत आहोत.

कर्ज पाच टक्क्याने, कागदांची यादी भलीमोठी

अतिवृष्टी आणि महापूरानंतर बँकेने ५ टक्के दराने कर्ज देण्याचे जाहीर केले. मात्र त्यासाठी कागदपत्रांची यादी भली मोठी असल्याने कोणाला लाभ मिळत नाही. याकडेही खताते यांनी लक्ष वेधले.

चित्रा चव्हाणही नाराज

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांनीही याविषयीची खदखद व्यक्त केली. खुल्या गटासाठी असलेली उमेदवारी आोबीसी महिलेस दिल्याने त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. या वेळी महिला शहराध्यक्षा दिपीका कोतवडेकर, माजी नगरसेविका सीमा चाळके,अविनाश हरदारे, विलास चिपळूणकर आदी उपस्थित होते.

नाराजीचे मुद्दे काय

  • पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही

  • खुल्यागटात आोबीसी महिलेला संधी

  • आपल्याच लोकांना संचालकाची संधी

  • बँक जपते कारखानदारांचे हित

  • इच्छुक महिलांना विचारणाही नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT