Shivsena Shivsena
कोकण

पराभूत झालेल्या शिवसेनेच्या माजी आमदारांना शिवधनुष्य पेलवणार?

गेल्या सात वर्षात सेना नेते किंवा सेना नेतृत्वाने त्यांची दखल घेतलेली नव्हती.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या सात वर्षात सेना नेते किंवा सेना नेतृत्वाने त्यांची दखल घेतलेली नव्हती.

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सेनेची काही अंशी जबाबदारी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. परंतु २०१४ मधल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले दळवी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर शिवधनुष्य पेलवू शकतील का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. या शंकेला पुष्टी मिळेल, अशीच गेल्या सात वर्षांमधील त्यांची कारकीर्द आहे.

शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी न देता, सेनेकडून गेल्या सात वर्षात दुर्लक्षित राहिलेल्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना पुन्हा एकदा त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी पक्षाकडून देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले सूर्यकांत दळवी यांनी त्यांच्या पराभवाला शिवसेना नेते जबाबदार असल्याचा आरोप निवडणुकीनंतर केला होता. त्यानंतर सातत्याने ते त्यांची भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडत आल्याचे म्हणत होते. परंतु गेल्या सात वर्षात सेना नेते किंवा सेना नेतृत्वाने त्यांची दखल घेतलेली नव्हती.

दरम्यानच्या काळात माजी आमदार दळवी अनेक वेळा राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत दिसून आले. दळवी यांनी नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच आपली एकट्याने लढण्याची क्षमता आहे किंवा नाही, याची खातरजमा न करताच राष्ट्रवादीसोबतच या आघाडीला मूर्त रूप दिले. गेल्या सात वर्षांमध्ये कडवा संघर्ष केला, त्या राष्ट्रवादीबरोबर जुळून कसे घ्यायचे, या संभ्रमात असलेल्या शिवसैनिकाची मनस्थिती दारूण झाली आहे. दापोली व मंडणगड नगरपंचायतीमध्ये आगामी निवडणुकीत नाराजांची बंडखोरी हा विषय नवीन सेना, राष्ट्रवादी आघाडीला डोकेदुखी ठरणार आहे.

सेना, राष्ट्रवादीतील आयारामांची गोची

गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांनी राष्ट्रवादीत तर गेल्या दोन वर्षात हा मतदारसंघ परत मिळवल्यानंतर अनेकांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आहे. परंतु नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षाची आघाडी झाल्याने या आयाराम गयारामांची गोची झाली आहे.

राष्ट्रवादी, अन्य पक्षांना पोषक भूमिका...

शिवसेनेने गेल्या सात वर्षांमध्ये लढवलेल्या ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीच्या कालखंडात सूर्यकांत दळवी यांची भूमिका शिवसेना विरोधातील राष्ट्रवादी व अन्य पक्षांना पोषक ठरली. सेनेचा प्रमुख विरोधी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. दळवी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कंपूत दिसून येत होते. त्यामुळे संदिग्ध भूमिकेतील दळवी यांच्या हाती शिवसेनेने आता नगरपंचायत निवडणुकीची सूत्रे दिली. त्यानी आघाडीला देखील मूर्त स्वरूप दिले. परंतु गत विधानसभा निवडणुकीनंतर राज्य पातळीवर झालेली आघाडी गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांना व राष्ट्रवादी कार्यकत्यांना मान्य झालेली दिसून आलेली नाही.

"माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे नगरपंचायतीच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी दिल्याची माहिती आम्हाला अजून पर्यंत मिळालेली नाही. निवडणुकीची सारी सूत्रे अद्यापही पालकमंत्र्याच्या हाती आहेत. राहीला दळवींचा विषय तर त्यांनी २५ वर्षे आमदारकी उपभोगली. पण दापोली, मंडणगड या दोन्ही तालुक्याचा काय विकास केला, हा संशोधनाचा विषय आहे."

- राजेंद्र पेठकर, शहरप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT