famous Kunkeshwar Yatra finally canceled konkan sindhudurg 
कोकण

प्रसिद्ध कुणकेश्‍वर यात्रा अखेर रद्द 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्‍वर (ता. देवगड) यात्रा रद्द झाली आहे. येथील शिष्टमंडळाशी आज चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यात्रा केवळ गाव पातळीवर होणार आहे. यासाठी आवश्‍यक सर्व सहकार्य जिल्हा प्रशासन करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठका घेतल्या. बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, आमदार वैभव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री सामंत म्हणाले, ""आमदार नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण घर बांधणीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 44 हजार क्विंटल भात खरेदी झाली. सुमारे 70 हजार क्विंटल खरेदी होण्याची शक्‍यता आहे. अलीकडे यासाठी पैसे कमी पडत होते. ते सुद्धा लवकर प्राप्त होतील. जिल्ह्याच्या विकासाचा वार्षिक आराखडा 170 कोटींचा मंजूर झाला आहे. रस्ते दुरुस्तीसाठी वेगळा 78 कोटी रुपये निधी मंजूर आहे. अजून 20 कोटींचा निधी लवकरच मंजूर होणार आहे. जिल्हा पत्रकार भवनसाठी आवश्‍यक एक कोटी 40 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. एकंदरीत जिल्ह्यात विकास निधी कमी पडणार नाही, यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत.'' 

शिवाजी महाराजांच्या स्मारकसाठी एक कोटी 
सिंधुदुर्गनगरीमध्ये प्रवेश करताना ओरोस फाटा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकसाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. येथे 30 मीटर उंचीचा तिरंगा उभा करण्यात येणार आहे. यासाठी सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरणच्या पुढील बैठकीत निविदा प्रक्रियेबाबत चर्चा केली जाईल, असे मंत्री सामंत यानी सांगितले. 

गंभीर आजारींना प्राधान्याने लस 
कोरोनाचा प्रादुभाव अन्य जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्गात नाही. स्थिती चांगली आहे. तरीही प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. अनुषंगाने दिवसाला किमान 300 कोरोना चाचण्यांचे उद्दिष्ट आहे. दहा दिवसात पाच हजार चाचण्यांचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 285 कोरोना लस दिल्या आहेत. केंद्राच्या निर्देशानुसार 60 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचे नियोजन सुरू आहे. 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनाही लस देण्याचा विचार आहे, असे मंत्री सामंत यानी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली पोस्ट; नेमकं काय म्हटलं?

ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

Pune News : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

Mangalwedha News : मनरेगाच्या नव्या योजनेत मजूर कामापासून वंचित; फक्त लाभार्थ्यांनाच संधी

Pune Rain Update : पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT