० 
कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलेच्या खून प्रकरणी पाचवा संशयित ताब्यात

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगावमधील त्या महिलेच्या खून प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. त्या महिलेचा खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात पाचव्या संशयिताचाही समावेश असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. नारायण भगवान गिरी (वय 34, मूळ सातारा, सध्या रा. कोलगाव) असे त्याचे नाव असून, पेट्रोल आणून देण्यापासून घाटामध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्यातपर्यंत त्याचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, त्याच्यासह या प्रकरणातील अन्य मुख्य दोघा संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची वाढीव कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा स्थानिक पोलिस कसून तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित योगेश आडणेकर याने कोलगाव परिसरात मोटारीमध्येच शारीरिक संबंध ठेवताना महिला मृत झाली होती. यावेळी घाबरलेल्या योगेश आडणेकर व त्याच्यासोबत असलेल्या तिघा संशयितांनी संबंधित महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट आंबोली घाटात लावण्याचा निर्णय घेतला. आडणेकर याने मोटार आणली, त्यात आंबोली येथे जाण्याएवढे पेट्रोल नव्हते. आडणेकर याने गिरीला कॉल करून कोलगाव येथे पेट्रोल आणावयास सांगितले. यानंतर मोटारीत पेट्रोल टाकून कोलगाव तिठा येथून सर्व बेळगाव महामार्गाने आंबोली येथे गेले. याबाबतचा सर्व प्रकार गिरी याला कळला. असे असतानाही त्याने आंबोली घाटात जाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतची आडणेकर याला साथ दिली. 

या प्रकरणात मुख्य चार संशयित असल्याचे सुरवातीस समोर आले होते; मात्र कोठडीत असणाऱ्या आडणेकर व कांबळेची सखोल चौकशी केल्यावर पाचव्या संशयिताचे नाव समोर आले आहे. संशयित असलेला योगेश कांबळेचा मोबाईल घाटात फेकून देणात गिरी याचाच हात असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस निरीक्षक अमित गोते, नवनाथ शिंदे व प्रसाद कदम यांनी आज आज त्याला कोलगाव येथील घरामधून ताब्यात घेतले. 
कांबळे व आडणेकरच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ झाली, तर गिरीला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. स्वप्नील कोरगावकर यांनी काम पाहिले. या प्रकरणात मोटार ज्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिली त्याचीही चौकशी सुरू राहणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक तोफिक सय्यद यांनी सांगितले.

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT