Fire Jaitapur Atomic Energy Project 
कोकण

 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना आज घडली. नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी  भडकलेल्या आगीमध्ये या भागांमधील हजारो आंबा आणि काजूची कलमे जळून खाक झाली आहेत.

संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. वाऱ्यासोबत भडकलेल्या आगीचे लोन जैतापूर प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पसरले. त्यामध्ये त्या परिसरातील बागांमधील हजारो कलमे जाळून खाक झाली. 

दरम्यान, आग विझविण्यासाठी त्या भागामध्ये कोणतीही यंत्रणा नसल्याने आगीचा भडका अधिकच उडाला. काही ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ही आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त कऱण्यात येत आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT