fraud case in konkan ratnagiri women fraud in family for gold jewellery 
कोकण

महिलेला व्यवसायाचे आमिष दाखवून तब्बल ७५ तोळ्याचे दागिने केले हडप

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : शहरातील काविळतळी येथील एका महिलेला कुंभार्ली येथील एका कुटुंबाने व्यवसायाचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल ७५ तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला अटक केली आहे.

त्याच्याकडून १० तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. लुबना राहिल अत्तार (रा.काविळतळी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रजिया कुंभार्लीकर, तरबेज कुंभार्लीकर, तन्वीर कुंभार्लीकर व अलीसाहब कुंभार्लीकर (सर्व रा. कुंभार्ली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लुबना अत्तार या शहरातील काविळतळी येथे राहतात. त्यांचे पती नोकरीनिमित्त परदेशात असतात.

कुंभार्ली येथील रजिया, तरबेज, तन्वीर व अलीसाहब कुंभार्लीकर हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. कुंभार्ली येथे आपल्या मालकीची जमीन असून त्यावर उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे. मात्र त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून ती आपण करावी, अशी मागणी या कुटुंबाने लुबना अत्तार यांच्याकडे केली होती. मात्र पैसे मिळत नसल्याने या कुंभार्लीकर कुटुंबाने लुबना हिला विविध आमिषे दाखवून तसेच गोड बोलून वेळोवेळी सोन्याचे दागिने घेतले. ही घटना २०१८ मध्ये घडली होती. दोन वर्षे झाली तरी कुंभार्लीकर कुटुंबाने लुबना यांना दागिने परत केले नाहीत. त्यांच्याकडे दागिन्यांची वारंवार मागणी करूनही चालढकल केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लुबना यांच्या लक्षात आले. 

२६ सप्टेंबर २०२० रोजी लुबना अत्तार यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत झगडे करीत होते. झगडे यांनी यातील संशयित आरोपी अलीसाहब कुंभार्लीकर यांना अटक करत त्याच्याकडून ७५ तोळे सोन्यापैकी १० तोळे सोने हस्तगत केले असल्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले. उर्वरित तीन संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक झगडे करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Baner Dowry Harassment Case : 3 महिन्यांपूर्वी लग्न, बाणेरमध्ये विवाहितेनं संपवलं आयुष्य; पतीचं अमेरिकेत शिक्षण, 21 तोळे सोन्यासाठी छळ

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

Latest Marathi News Live Update : Mumbai Pune Expressway वर अवजड वाहनांना दोन दिवस बंदी

विज्ञानक्षेत्र अडकतेय कर्मकांडात!

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद! तुमच्या शहरातील सुट्ट्या कधी ते पाहा

SCROLL FOR NEXT