gram panchayat election shivsena bearers work sangli for election in chiplun ratnagiri 
कोकण

निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा लागणार कस ; मतदारांच्या गाठीभेटीवर भर

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या महत्त्‍वाची असलेल्या सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत ८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ जागांसाठी येथे लढत होत आहे. ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. सावर्डेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्यायाने आमदार शेखर निकम यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.

तालुक्‍यातील खेर्डीनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून सावर्डे ग्रामपंचायतीचा लौकिक आहे. ती बिनविरोध होण्यासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न होते. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत १७ पैकी १ जागा केवळ विरोधकांना मिळाली होती तर एका जागेवर समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीवर झालेल्या निवडीतही राष्ट्रवादीचा सदस्य विजयी झाला होता. या वेळची निवडणूक बिनविरोध करताना शिवसेनेकडून ७ जागांची मागणी केली. यात तडजोड झाली नाही. तरीही चर्चेतून ८ जागा बिनविरोध झाल्या.

आमदार निकम यांचे सहकारी जमीर मुल्लाजी हेदेखील सावर्डेत बिनविरोध झाले आहेत. सावर्डेत आमदार शेखर निकम यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीत जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तालुकास्तरीय नेते अजूनही ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांनाच लढाईस सामोरे जावे लागते आहे.


बिनविरोध निवड..

सावर्डेतील बिनविरोध निवड झालेले उमेदवार ः

सीमा गुढेकर, जान्वही पाटेकर, सायली खताते, नेहा मेस्त्री, अंकिता सावंत, समिया मोडक, जमीर मुल्लाजी, विजय बागवे.

मतदारांच्या गाठीभेटीवर भर

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे घरोघरी धाव घेत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. परगावी असलेल्या मतदारांनाही मतदानासाठी आणण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठीच्या वाहनांचे, एसटीचेही बुकिंग केले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT