Gram Panchayat Velneshwar elected unopposed 
कोकण

गावानेच बनवली आचारसंहिता; 35 वर्षांनी वेळणेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध

मयुरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेली, मोठी ग्रामपंचायत वेळणेश्वर आज बिनविरोध झाली. येथील चार प्रभागातून 11 जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 7 डमी उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे 35 वर्षांनी वेळणेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले.

सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर आणि गेली पाच वर्ष सरपंच असलेले नवनीत ठाकूर यांनी केलेले काम ही देखील वेळणेश्वरची ओळख आहे. तसेच राजकीयदृष्ट्‌या 10 वर्षांपूर्वी तालुक्‍यातील वेळणेश्वर या एकमेव ग्रामपंचायतीत मनसेची सत्ता होती,ही आणखी एक ओळख.

वेळणेश्वर गावातील राजकारण गेली 5 वर्ष सरपंच नवनीत ठाकूर व सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर यांच्याभोवती फिरत होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वेळणेश्वर ग्रामपंचायतीवर नवनीत ठाकूर यांचे वर्चस्व राहील अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र याला धक्का बसला आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तरुणांनी वाडीनिहाय बैठका केल्या. सर्व वाड्यांचे प्रतिनिधित्व असलेली कोअर कमिटी ठरविण्यात आली. उमेदवार निवडीसह ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी आचारसंहिता ठरविण्यात आली. त्यामध्ये उमेदवार प्रभागाबाहेरचा नको, कोअर कमिटी सरपंच, उपसरपंचाचा निर्णय घेईल तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील. प्रत्येक ग्रामसभा, मासिक सभेपूर्वी व नंतर लोकप्रतिनिधी आणि कोअर कमिटीची बैठक होईल. असे अनेक मुद्दे या आचारसंहितेत नमुद आहेत. त्याला अनुसरुन प्रभाग 1 (गुढेकर वाडी वेदवाडी खारवीवाडी), प्रभाग 2 (बाजारपेठ), व प्रभाग 3 (भाटी, आगरवाडी, गोनबरेवाडी, पाडावे वाडी, ओझरवाडी) मधील उमेदवारांची निश्चिती झाली.

प्रभाग क्र. 4 बाजुला होता.

या सर्वांपासून वेळणेश्वर ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्र. 4 (वाडदई) बाजुला होता. आमचे उमेदवार गणशोत्सवात मुंबईकरांसोबत झालेल्या सभेत ठरले आहेत. त्या उमेदवारांना सोबत घेवून आम्ही गावपॅनेल बरोबर आहोत. अशी भूमिका प्रभाग 4 मधील ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे गावपॅनेलने तेथे उमेदवार उभे केले नाहीत. परिणामी बाजारपेठत राहणाऱ्या सरपंच नवनीत ठाकूर यांच्यासह ठाकूर गटाचे अन्य दोनजण प्रभाग 4 मधून बिनविरोध आले आहेत. अशारितीने ग्रामपंचायत वेळणेश्वरची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT