Insect attack on mango season The gardeners panicked 
कोकण

आंबा हंगामावर किडीचे आक्रमण; बागायतदार धास्तावले

सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) - कोरोनामुळे मागील आंबा हंगाम काहीसा अडचणीत सापडला असतानाच यंदाच्या हंगामावरही किडरोगाच्या प्रादुर्भावाचे आतापासूनच संकट आहे. कलमांना आंबा मोहोर येऊन यंदाच्या हंगामाची चाहुल लागली असतानाच बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने फवारणीने वेग घेतला. देवगड हापुसची सुमारे 20 टक्‍के आंबा कलमे मोहोरली असून सुमारे 20 टक्‍के पालवीचे प्रमाण आहे. यंदा आंबा लांबण्याची शक्‍यता यामुळे दिसत आहे. 

यंदा पाऊस लांबल्यामुळे आपोआपच थंडी लांबली. त्यातच पुन्हा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे आंबा हंगामातील पोषक वातावरणात व्यत्यय आला. ढगाळ वातावरणामुळे झाडांना आलेली पालवी तसेच मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवू लागला. तुडतुड्यांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी बागायतदारांना फवारणी वाढवावी लागली. त्यामुळे अजून हंगामाची म्हणावी तशी स्पष्टता दिसत नसली तरी बागायतदारांच्या उत्पादन खर्चास आतापासूनच सुरूवात झाली आहे.

आताचे तुडतुड्यांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी वाढवावी लागणार आहे. याचा हंगामाच्या पुढील टप्यात फायदा होण्याची शक्‍यता असली तरी यामुळे आंबा उशिराने येऊन हंगाम लांबण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे एकाचवेळी आंबा तयार झाल्यास त्याचा दरावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. सध्या तालुक्‍याच्या विविध भागात आंबा कलमांवर फवारणी सुरू आहे. आजपासूनच किनारपट्टीवरील वातावरण बदलले असून थंडीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदाराच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. 

सध्या कडाक्‍याची थंडी पडत असली तरीही त्याचा आंबा हंगामाच्या दृष्टीने म्हणावा तसा लाभ होण्याची शक्‍यता कमी आहे. कारण सध्या आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी आली आहे. पालवी जून झाल्याशिवाय मोहोराची शक्‍यता कमी असते. त्यामुळे थंडी पडूनही मोहोराचे प्रमाण सध्या वाढण्याचे प्रमाण अल्पच राहील असे दिसते. काही भागात मोहोरावर बारीक कणी दिसत आहे. त्यामुळे जोराच्या थंडीमुळे फळगळ होण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. तसेच आताच्या मोहोरामागून पुन्हा मोहोर येईल त्याला जानेवारी उजाडेल. अर्थात यातून यंदा हंगाम लांबण्याची शक्‍यताच अधिक दिसते 

पंप दुरूस्ती कामांनाही वेग 
सुरूवातीला पडलेल्या थंडीमुळे काही प्रमाणात झाडांना मोहोर आला. त्यानंतरचे ढगाळ वातावरण, पावसाळी हवामान यामुळे तुडतुड्यांचे प्रमाण वाढले. काही झाडांना आलेला मोहोर काळवंडला आहे. यातून फवारणी खर्चास सुरूवात झाली. सध्या हंगामाच्या दृष्टीने फवारणी पंप दुरूस्तीच्या कामांनाही वेग आला आहे. किटकनाशक विक्रेत्यांकडे बागायतदारांच्या खेपा वाढल्या आहेत. 


""आंबा कलमांना पालवी आली असून सुमारे 20 टक्‍के कलमे मोहोरली आहेत. हवामान बदलामुळे तुडतुड्यांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे काही भागात आलेला मोहोर काळवंडला. किडरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी वाढवावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. कडाक्‍याची थंडी पडल्यावर मोहोराचे प्रमाण वाढेल; मात्र यंदा आंबा हंगाम लांबण्याची शक्‍यताच अधिक दिसते.'' 
- रूपेश पारकर, आंबा बागायतदार, वरेरी, देवगड 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT