Mumbai-Goa Highway esakal
कोकण

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

Mumbai-Goa Highway : गतवर्षी गणेशोत्सवात एका भुयारी मार्गातून छोटी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

२५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वीच कोकणात ये-जा करण्यासाठी लहान वाहनांना कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कशेडी घाटाला (Kashedi Ghat) पर्यायी दोन भुयारी मार्गांपैकी नव्याने वाहतुकीस सुरू केलेला एक भुयारी मार्ग अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी आजपासून (ता. २०) वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून वाहतुकीस खुला करण्यात आला होता.

गतवर्षी गणेशोत्सवात एका भुयारी मार्गातून छोटी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती; मात्र त्यानंतर पुन्हा तो भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू झाले. २५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वीच कोकणात ये-जा करण्यासाठी लहान वाहनांना कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली.

पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीनंतर परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कशेडी घाट आणि पर्यायी भुयारी मार्गाच्या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली नाही. पर्यायी भुयारी मार्गावरील गटारलाईन, दर्शनी भाग, संरक्षक भिंत, सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी उद्यापासून वाहतूक पुन्हा बंद केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT