Sharad Pawar Supriya Sule  sakal
कोकण

'सुप्रिया सुळे आत्ताच सांगतो...' सोमय्यांची दापोलीतून राष्ट्रवादीवर तोफ

सकाळ डिजिटल टीम

अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट आपण तोडून दाखवणारच असा विश्वास भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे रिसॉर्ट तोडून दाखवणारच असे सांगत तुम्ही ते वाचवून दाखवा असे सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी मागील आठवड्यातच त्यांचा दापोलीतील कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार ते आज दापोलीत दाखल झाले.

यावेळी सोमय्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावं घेत पुढच्या आठड्यात तीन नेत्यांवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं.

एक एक माफियांना जेलमध्ये जावं लागणार आहे. अनिल परब, अजित पवार, हसन मुश्रीफ यांना कोणतं सर्टिफिकेट हवं आहे, हे शरद पवारांनी ठरवावं, असं सोमय्या म्हणाले. मात्र, डर्टी डझन्सवर कारवाई होणार म्हणजे होणार, यावर ठाम असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे म्हणतात, सोमय्यांना कसं कळतं की छापे पडणार आहेत. तर आत्ताच सांगतो, पुढच्या आठवड्यात तीन मंत्र्यांवर छापे पडणार आहेत, असं सोमय्या म्हणाले.

भाजप कार्यकर्ते आणि निलेश राणेंनी सोमय्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी सोमय्यांनी परब यांच्यावर आरोप केले. अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत आम्हाला थांबवून दाखवा, असं म्हटलं. सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि खरमाटे यांच्या सारख्या वसुली एजंट्सला आता आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

अर्थभान : ‘सीएएस’चा नवा पेच

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस; प्रकृती खालावली, समर्थकांनी महामार्ग रोखला

स्मार्ट गुंतवणूक : ग्रीन डिपॉझिटची सुविधा

ढिंग टांग : विषाला उतारा विषाचाच..!

SCROLL FOR NEXT