कोकण

आंदोलन करण्यापेक्षा जनतेमध्ये जाऊन जागृती करा : नारायण राणे

आंदोलन करण्यापेक्षा या भयंकर आजाराबाबत जनतेमध्ये जाऊन जनजागृती करा

सकाळ डिजिटल टीम

सावंतवाडी : जिल्ह्यात कोरोनामुळे (sindhudurg district) आपल्या जवळचे, सोबत वावरणारे हे जग सोडून जात आहेत. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा या भयंकर आजाराबाबत जनतेमध्ये जाऊन जनजागृती करा, (corona) लोकांचे जीव वाचवा असा घरचा आहेर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी आज येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना दिला.

तेली यांनी कोरोनामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने सुरू असल्याचे सांगितले. ती यापुढेही सुरू राहतील, गावागावातही ही आंदोलने होतील, असे सांगितले यावर श्री. राणे यांनी तेलींना (rajan teli) सुनावले. कोलगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तेथील पाटीदार समाज हॉलमध्ये सुरु केलेल्या 30 बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन श्री. राणे यांच्या हस्ते झाले यावेळी आहे ते बोलत होते.

राणे म्हणाले, "जगात, देशात व राज्यात तसेच आपल्या गावातही कोरोनामुळे सध्या भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या कोरोनाग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. म्हणूनच कोरोनाशी लढा देणे हे आपले कर्तव्य समजून महेश सारंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेला हा विलगीकरण (isolation) कक्ष व अन्य सुविधा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा देऊन त्यांना कोरोनामुक्त करून आपला गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करा. आज कोरोना आजाराला घाबरून लोक घरातच उपचार करत आहेत हे चुकीचे असून जनतेने त्वरित डॉक्टरकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आंदोलने करण्यापेक्षा जनतेमध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती करा. कोरोनाला घाबरून न जाता त्वरीत उपचारासाठी घराबाहेर पडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. त्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT