कोकण

मुख्यमंत्र्यांबाबत 'ही' बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे

अर्चना बनगे

रत्नागिरी: उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे. असा सणसणीत टोला भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज (गुरुवार) tweet करुन मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तौक्ते वादळामुळे (Tauktae cyclone) नुकसान झालेल्या भागाचा दौरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Leader of Opposition Devendra Fadnis) हे करत आहेत. देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई -पास काढला आहे का? अशी विचारणा माहितीच्या अधिकारात झाल्याने यास राणे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

nilesh rane criticism on CM Uddhav Thackeray Leader of Opposition Devendra Fadnavis visit on konkan marathi news

सध्या राज्यभर अनेक मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. या काळात कोरोनाचा प्रसार ही देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रात सगळीकडे लाॅकडाऊन सुरू आहे. मात्र नेत्यांचे दौरे सुरुच आहेत. काल देवेंद्र फडणवीस रायगड दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्ह्याची पाहणी केली.आज रत्नागिरी दौरा तर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी त्यांनी ई -पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आले. याला प्रत्यूत्तर निलेश राणे यांनी ट्विट करून दिले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस नगर जिल्ह्यात दौऱ्यावर गेले असता कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या दौऱ्यात नियमांचे उल्लंघन होते आहे. त्यांनी फिरण्यासाठी ई-पास काढलाय का? तसे असल्यास अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागितली आहे.यावर उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे. असा खोचक टोला निलेश राणे यांनी महाविकासला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

Bank Holiday: 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी बँका राहणार बंद; बँकेत जाण्याआधी पाहा RBIची यादी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT