nitsh rane criticized on state government topic of pooja chavan in sindhudurg 
कोकण

पूजा चव्हाण प्रकरणावरून 'दीवार' आठवला; नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या पुजा चव्हाण या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राज्यसरकारच्या काही नेत्यांची नावे या प्रकरणात पुढे येत असल्याने विरोधक त्याच्यावरुन टिकास्त्र सोडत आहेत. दरम्यान दोन दिवसांपुर्वी भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही सरकारवर टिका केली होती. चित्रा वाघ यांच्या पतीला एसीबीची नोटीस आल्याने दबाव टाकला जात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. याच पार्श्वभूमीवर काल आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटद्वारे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

राणे म्हणाले, 'शिवसेनेमध्ये पूजा चव्हाण प्रकरणावरून 'दीवार'चा डायलॉग आठवला. संजय राठोड आणि baby penguin आमने सामने... संजय राठोड : में पुराना शिवसैनिक हूँ.. मेरे पास बंगला, गाडी, मंत्रिपद सबकुच हैं.. तो भी लग गयी.. तेरे पास क्या है ?? Baby penguin : मेरा बाप CM है इसलिए मुझे सब माफ है !' असा टोला त्यांनी लगावला आहे. 

दरम्यान या प्रकरणी राज्यातील महिला आघाडींनी कंबर कसून मंत्री संजय राठोड यांना शिक्षा होण्यासाठी आंदोलने, मोर्चे काढले आहेत. तसेच त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणीही केली आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ जुलै २०२६ ते २४ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

IND vs ENG: "रोहित-विराट यांच्याशिवाय 2027 वर्ल्ड कप जिंकणे अवघड!", मेस्सीचं उदाहरण देत दिग्गज क्रिकेटर स्पष्टच बोलला

Shirur Gun Firing : जुन्या वादातून सात जणांनी एकावर पिस्तुलातून केला गोळीबार; जीव वाचविण्यासाठी तरूणाने मारली तळ्यात उडी

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता सिलिंडरमधील उरलेल्या गॅसचा पूर्ण वापर होणार; तेल कंपन्यांचा नवा फॉर्म्युला काय?

SCROLL FOR NEXT