political news in chiplun for two party and mahavikas aghadi in chiplun ratangiri 
कोकण

महाविकास आघाडीत फूट

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : येथील पालिकेत स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमुळे तहकूब झालेली विशेष सभा नुकतीच झाली. या सभेत पाग येथील रस्त्याच्या कामावरून गदारोळ झाला. एक तास गरमागरम चर्चा झाल्यावर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक मोहन मिरगल यांनी ठराव मांडला. त्यावर महाविकास आघाडीच्या नगरसेविका शिवानी पवार यांनी उपसूचना मांडली. हा ठराव १३ विरुद्ध आठ मतांनी मंजूर झाला.

उपसूचनेच्या बाजूने राष्ट्रवादीचे तीन, तर भाजपच्या नगराध्यक्षांसह चार नगरसेवकांनी मतदान केल्याने महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचे दिसून आले. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेत शहरातील रामतीर्थ तलाव, बापट आळी, सोनार आळी, वाणी आळी, स्वामीमठ रस्त्याच्या कामावरून वाद झाला. पाग येथील प्रभाग १३ भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व आरसीसी गटाराचे बांधकाम करणे आदी कामांबाबत आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी नगरसेवक मोहन मिरगल यांनी केली; मात्र नगरसेविका शिवानी पवार यांनी या रस्त्यावर दोन थर झाले आहेत मग आता मंजुरी कशी? असा आक्षेप घेतला.

यावरून नगरसेवक परिमल भोसले व अविनाश केळस्कर, उमेश खताते व विजय चितळे तसेच शशिकांत मोदी व चितळे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. अखेर मिरगल यांनी निर्णय घेताय की आम्ही ठराव मांडू, असे विचारले असता नगराध्यक्षा खेराडे यांनी मिरगल यांना ठराव मांडण्याची अनुमती दिली. रस्त्याच्या कामाला आर्थिक प्रशासकीय मान्यता मिळावी असा ठराव मांडला. त्याला जयश्री चितळे यांनी अनुमोदन दिले. या ठरावाच्या बाजूने १३ मते पडली; तर या ठरावाच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिवानी पवार यांनी त्याला उपसूचना मांडली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सामन्यापूर्वी धक्का, स्टार फलंदाज जखमी! गुजरात टायटन्सकडून ऑल राऊंडरचे पदार्पण

Raghav Chadha: 'आम आदमी पार्टी' फोडणाऱ्या राघव चड्ढांकडे किती संपत्ती? शिक्षण किती झालंय?

Kidney Transplant : अर्धांगिनीचा त्याग! किडनी देऊन पतीला दिले जीवदान; मरणाच्या दारातून पतीला परत आणणाऱ्या पत्नीचे कौतुक

Shardul Thakur ला खेळवण्यावरून झाला वाद, बचावासाठी मुंबई इंडियन्स मैदानात.. प्रशिक्षकाने अंपायरकडे दाखवलं बोट

Pune Crime : पुण्यातील कॅम्प परिसरातून २८ लाखांचे अमली पदार्थासह पिस्तूल, मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसे जप्त

SCROLL FOR NEXT