कोकण

भारजा नदीवर श्रमदानातून दोन बंधारे

सकाळवृत्तसेवा

मंडणगड - उन्हाळ्यात घटणाऱ्या जलस्रोतांचे बळकटीकरण व्हावे याकरिता कुंबळे ग्रामपंचायतीने भारजा नदीपात्रात लोकसहभागातून बंधारा बांधण्यात आला आहे. सुमारे ७० फूट लांब व ३ फूट उंच असा बंधारा बांधण्यात आला आहे. 

नदीपात्रात वाढत चाललेली जलवनस्पती व गाळाने भरत असलेल्या पात्रामुळे मुबलक पाऊस पडूनही नदीमध्ये पाणी साठून राहत नाही. यामुळे गावातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची पातळी मार्चअखेर कमी होऊ लागते. यावर उपाय म्हणून नदीपात्रात पाणी असतानाच बंधारे बांधल्यास फायदा होऊ शकतो.

याच संकल्पनेतून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मार्गदर्शनाने व ग्रामपंचायतीने बौद्धवाडी व दळवीवाडीमधील ग्रामस्थ आणि हुतात्मा भोईटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने श्रमदानातून दोन बंधारे बांधले. विशेष म्हणजे गावची नळपाणी योजनेची विहीर असलेल्या ठिकाणीच हे दोन्ही बंधारे बांधले गेले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात गावच्या नळपाणी योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होण्याचा धोका कमी झाला आहे. या वेळी सरपंच किशोर दळवी, भोईटे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. घाणेकर, ग्रामसेवक श्री. बुध उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

पहिलीच मालिका गाजली तरीही छोट्या पडद्यावरून का गायब होती दीपा परब? स्वतः सांगितलं कारण, म्हणाली-

Salary System News: भारतीयांना आता महिन्यात दोन वेळा मिळणार पगार? कोणी दिला प्रस्ताव? कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता

INDW vs ENGW: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का; इंग्लंडमध्ये खेळताना 'या' एका चुकीमुळे टीम इंडियाने मालिका गमावली!

Konkan MLC Bala Mane : कोकण विधान परिषद बिनविरोध, बाळ मानेंची माघार, ठाकरे गटाकडून मानेंची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT