कोकण

रत्नागिरीत शिवसैनिक आक्रमक; आमदारांसह, कार्यकर्त्यांचे फलक फाडो आंदोलन

राजेश कळंबटे, राजेश शेळके

लांजा-राजापूर विधानसभेचे आक्रमक आमदार राजन साळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उतरत शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले.

रत्नागिरी - कालच्या नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या विरोधातील व्यक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक पेटले आहेत. याचे पडसाद रत्नागिरीतही पाहायला मिळाले आहेत. लांजा-राजापूर विधानसभेचे आक्रमक आमदार राजन साळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले. नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात रत्नागिरीचे (ratnagiri update) शहराचे शिवसेना शहर संघटक प्रसाद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत मारुती मंदिर येथे केलेल्या फलक फाडो आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली.

यावेळी आमदार राजन साळवी (rajan salavi) यांनी स्वतः पुढाकार घेत नारायण राणे यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला. मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना रत्नागिरी सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उप जिल्हाप्रमुख महेश म्हाप, संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी बिपीन बंदरकर ह्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.

रत्नागिरी शिवसैनिकांनी केली तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिक तक्रारी दाखल करत आहेत. आत्ता काही वेळापूर्वी रत्नागिरीतील शिवसैनिकांनीही शहर पोलिस स्थानक गाठले असून या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT