कोकण

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला

तुषार सावंत

या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

कणकवली : राज्यांचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब (anil parab) यांच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील बंद असलेल्या निवासस्थानी अज्ञाताने सोडा बॉटल मारुन हल्ला चढवला आहे. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला आहे. (konkan update) या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेला पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (konkan News)

शिवसेना आणि नारायण राणे (narayan rane) यांच्यातील वादाची ठिणगी आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागली आहे. मंगळवारी खासदार विनायक राऊत यांच्या मालवण तालुक्यातील तळेगाव येथील निवासस्थानावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना ताजी आहे. असे असताना मंगळवारी रात्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे.

कणकवली पोलिस हरकुळ खुर्द येथे पोहचले असून स्थानिकांनी ही माहिती फोंडाघाट पोलिसांना दिली आहे. त्यामुळे फोंडाघाट पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्यातरी गावात वातावरण निवळले असली तरी स्थानिकांच्या मते यामागे राजकीय हात असून या तालुक्यातील काही पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT