pali murd fort sakal
कोकण

Diwali 2020 : बच्चे कंपनीसह मोठ्यांना मातीच्या किल्ल्यांची भुरळ

Pali : दिवाळीत मोठ्यांनी आणि लहानांनी मातीचे किल्ले तयार करण्यास पसंती दिली आहे, ज्यामध्ये सरसगड, पारगड आणि पद्मदुर्ग यांची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक समुदायात एकत्र येण्याचा आनंद साजरा केला जात आहे.

अमित गवळे: सकाळ वृत्तसेवा

पाली : दिवाळी म्हणजे मौज, मजा आणि आनंदाचा सण आहे. डिजिटल व रेडिमेड च्या युगात देखील बच्चे कंपनीसह मोठेही किल्ले बनविण्यास पसंती देतात. बहुसंख्य गावांमध्ये अजूनही मुले व तरुण किल्ले बनवण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतवताना दिसतात. मातीचे मावळे व प्राणी आणि महाराजांच्या मूर्ती बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. तसेच रेडिमेड किल्ले सुद्धा विक्रीला आले आहेत.

पालीतील श्री स्वामी समर्थ नगर येथील हरिओम वास्तू बिल्डिंग येथे बिल्डिंग मधील सर्व रहिवाशांनी मिळून सरसगड किल्ल्याची हुबेहू प्रतिकृती तयार केली आहे. तसेच पालीतील खडक आळी येथे किल्ले पद्मदुर्ग ( मुरुड ) साकारण्यात आला आहे. हा किल्ला हुबेहूब वाटत आहे. आणि येथील पंकज बेलोसे, राज जाधव, पिंट्या बेलोसे, मंथन बेलोसे, प्रज्ञा बेलोसे यांनी किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. तर येथील कुंभारवाड्यात देखील पारगड किल्ल्याची अतिशय हुबेहूब आणि सुरेख प्रतिकृती बनवण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत मुर्त्यांच्या किमती यंदा 10 ते 20 टक्क्यांनी वधारल्या आहेत. पालीतील कारागीर ज्योती कुंभार यांनी सांगितले की विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे समाधान आहे. पालीतील स्पंदन शिंदे याने सांगितले की शिवाजी महाराज, मावळे, विविध प्राणी यांच्या मुर्त्या किल्ल्यावर ठेवलेल्या बघायला खूप आवडते.

मातीचे किल्ले बनविण्याला पसंती

डोंगर, माळरान व शेतातून लाल किंवा काळी माती घमेल्यात किंवा पोत्यामध्ये टाकुन आणायची आणि सर्व मित्र मंडळी मिळून किल्ला बनविण्याची मज्जा काही औरच आहे. हा आनंद गाव व खेड्यातील तर काही प्रमाणात शहरातील मुले घेतांना दिसली. किल्ल्याला मावळे, सैनिक, प्राणी व रंग यांनी सजवायचे. त्यावर पाण्याचे कारंजे लावायचे. मोहरी टाकून गवत उगवायचे. रात्री किल्ल्यावर रोशनाई करायची अशा विधायक उपक्रम दिवाळीत अनेक गावातील मुलांनी केला. बच्चे कंपनीसह मोठे देखील यामध्ये सहभागी होतांना दिसत आहेत.

विविध प्रकारच्या मुर्त्या

किल्ल्यावर ठेवण्यासाठी प्लास्टिक पेक्षा मातीच्या मूर्तींना मागणी आहे. बाजारात शिवाजी महाराज व मावळ्यांच्या विविध आकाराच्या व मुद्रांच्या आणि रंगांच्या मुर्त्या उपलब्ध आहेत. याबरोबरच मातीच्या ढाल, तोफा आदि युद्ध साहित्य देखील आहेत. शिवाय विविध देवीदेवता, प्राणी ( हत्ती, वाघ, बैल इत्यादी) सुद्धा मिळत आहेत.

मध्यम आकाराची शिवाजी महाराजांची मातीची मूर्ती 80 ते 150 रुपयांना आहे. तर मातीचे मावळे, प्राणी 20 ते 30 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. ठिकठिकाणी यामध्ये थोडाफार फरक आहे.

रेडिमेडला सुद्धा मागणी

सध्या रेडिमेड किल्ल्यांना देखील मागणी आहे. शहरात, इमारती, वसाहती आदी ठिकाणी मग हे रेडीमेड किल्ले लावले जातात. आणि त्यावर मावळे व शिवाजी महाराजांची मुर्ती विराजमान केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज, मावळे व इतर मूर्तींना मागणी आहे. विक्री सुद्धा वाढली आहे. अनेकजण चांगला प्रतिसाद देत आहेत. शिवाय या मुर्त्या मातीच्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आहेत.

नारायण बिरवाडकर, मूर्ती विक्रेत्या

दिवाळीत दरवर्षी आवर्जून किल्ला बनवतो. यावर्षी बिल्डिंग मधील सर्वांनी किल्ला बनवला आहे. मातीचा किल्ला बनवायला खूप आवडते. किल्ला व त्यावर महाराजांची मूर्ती, मातीचे मावळे विराजमान झालेले पाहायला अभिमान वाटतो. किल्ला बनवितांना खूप मज्जा येते.

श्रेया प्रणाली सूरज शेळके, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT