कोकण

एसटीच्या टायरचे रिमोल्डचे रबर पूर्णतः निघाले

CD

एसटीच्या टायरचे रिमोल्डचे
रबर पूर्णतः निघाले
कराडनजीक खोळंबा ; प्रवासी संतप्त
देवरूख, ता. २२ः रिमोल्ड टायर घातलेली गाडी दामटण्यात आली खरी, मात्र त्याच टायरचे रिमोल्डचे रबर पूर्णतः निघाले, अन प्रवासी हैराण झाले. ही गाडी लांब पल्ल्याची असल्याने प्रवासी या कारभाराबाबत संतापले होते.
देवरूख बस स्थानकावरून सकाळी सव्वाआठला सुटणारी देवरूख-पुणे गाडी (एमएच-०९-एफएएल-१०७५) ही बस सकाळी देवरूख डेपोत मागील टायर पंक्चर झाल्याने दुरुस्तीला दिली. रिमोल्ड केलेला टायर टाकून हेड मॅकेनिक यांनी गाडी चेक करून दिली. गाडी प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली. ती कराड जवळ जाताच त्याच टायरचे रिमोल्डचे रबर पूर्णतः निघाले. पंक्चर काढण्यासाठी रस्त्यात एकही दुकान सुरू नसल्याने ही गाडी जवळ जवळ २५ किमीपर्यंत तशीच पंक्चर काढणाऱ्याकडे नेण्यात आली. लांब पल्ल्यांच्या गाड्या सुस्थितीत असायला हव्यात ही प्रवाशांची माफक अपेक्षा असते. मात्र त्याला एसटी महामंडळाचे अधिकारी तिलांजली देताना दिसत आहेत. त्यांना प्रवाशांच्या जीवाशी काही देणे घेणे दिसत नसल्याचे या प्रसंगावरून निदर्शनास येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य ग्रंथ दिंडी

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT