कोकण

आम्ही विकासाने मने जिंकतो, समाधानाने पक्ष वाढवितो

CD

विकासाने मने जिंकतो;
समाधानाने पक्ष वाढवितो
उद्योगमंत्री सामंत; राज्यात आमचेच सरकार येणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ‘‘आम्ही विकासाने लोकांची मने जिंकतो. आमच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात समाधानी वृत्ती असणारे लोकप्रतिनिधी येत आहेत. समाधानाने आम्ही पक्ष वाढवत आहोत,’’ असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. २००४ ते २०१९ पर्यंतच्या निवडणुकींबाबतचे चार सर्व्हे मी पाहिले आहेत. त्याने काही परिवर्तन होत नाही. पुढील निवडणुकीनंतर राज्यात आमचेच सरकार येणार आणि ४२ हून अधिक खासदारांसह आम्ही लोकसभेत जाणार, असा विश्‍वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मंत्री सामंत म्हणाले, ‘‘पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काहीजण आमच्या सरकारवर टीका करत आहेत. मात्र टीका करणारे सत्तेत असताना त्यांनी याबाबत काय केले याचे आत्मचिंतन करावे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून राज्यात १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यात परकीय गुंतवणूकही आहे. मला राज्यातील तरूणाईसाठी रोजगार निर्मिती करायची आहे. त्यामुळे ट्वीट आणि टीका टिप्पणीकडे मी लक्ष देत नाही. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेअंतर्गत सीमाभागात उद्योग उभारणीसाठी कर्ज वितरण केले जाणार आहे.’’

सीमाभागातील
विद्यार्थ्यांना न्याय देणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना सरळसेवा परीक्षा देता यावी याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत मी चर्चा करणार आहे. या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

एक व्यक्ती मालतीचा पाठलाग करत होता... प्रियांका चोप्राने सांगितला लेकीबद्दलचा भयानक अनुभव, म्हणाली- त्याच्यामुळे...

T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी ६ कोटी रुपये, गौमत गंभीरला किती?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

IPL 2026: वर्ल्ड कप विजेते २ कर्णधार, उपविजेता कर्णधार अन् फायनलमधील सामनावीर; Hardik Pandyaच्या नेतृत्वाखाली चार स्टार खेळणार

SCROLL FOR NEXT