कोकण

कामगारांना मिळणार 2 लाखांचा मोफत विमा

CD

कामगारांना मिळणार २ लाखांचा मोफत विमा

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी आवश्यक; असंघटितांना होणार फायदा

रत्नागिरी, ता. २१ : जिल्ह्यातील असंघटीत कामगारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची माहिती एकत्रित करण्याच्यादृष्टीने शासनाच्या कामगार विभागाकडून ई-श्रम पोर्टल'' विकसित करण्यात आले आहे. यावर नोंदणी करणाऱ्या कामगारांना २ लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.
विविध क्षेत्रात कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, हे कामगार असंघटित असल्याने असल्याने त्यांच्या वेतनापासून अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा कामगारांची एकत्रित माहिती जिल्हास्तरावर संघटित केला जात आहे. जिल्हा कामगार कार्यालयाकडून ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. ई श्रम कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी eshram.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते. त्यांनतरच ई श्रम कार्ड मिळणार आहे.
अपघाती विमा काढल्या असंघटित क्षेत्रातील कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास आणि त्याचे ई श्रम कार्ड असल्यास त्याच्या वारसाला २ लाख रूपये मिळतात. अपंगत्व आल्यास त्याला १ लाख रूपयांची मदत मिळते. जास्तीत जास्त कामगारांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने केले आहे.
-
आवश्यक कागदपत्रे

असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्डच्या माध्यमातून एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या दोन लाखांचा विमा दिला जातो. यासाठी आधार कार्ड मोबाईलला लिक केलेले असावे. मोबाईल नंबर तसेच बँक खाते बुक आणि कामाच्या ठिकाणचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
--
कोट
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सध्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली जात आहे. या कामगारांना अन्य लाभांसह मोफत दोन लाखांचा अपघात विमा दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या मुलांसाठीही विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांनी या ई श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.
--एस. एस. आयरे, सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT