कोकण

नांदगाव येथील मोजरकरांना ‘पुरूष सन्मान’ पुरस्कार प्रदान

CD

99320
कणकवली : येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात ऋषिकेश मोरजकर यांना ‘पुरूष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.


नांदगाव येथील मोजरकरांना
‘पुरूष सन्मान’ पुरस्कार प्रदान

कणकवली, ता.२९ : महिला आर्थिक विकास महामंळातर्फे नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरजकर यांचा पुरूष सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. कणकवली पंचायत समिती सभागृहात हा कार्यक्रम झाला. दरम्‍यान, जिल्‍हा पातळीवरील पुरूष सन्मान पुरस्कारासाठी कणकवली तालुक्‍यातून तिघांची निवड झाली आहे. यामध्ये ऋषिकेश मोरजकर, सूर्यकांत ढवण आणि शैलेश तळेकर यांचा समावेश आहे.
‘महिला सक्षमीकरणासाठी पुरूषांचा सहभाग’ या सामाजिक भावनेतून कार्य करणाऱ्या पुरूष कार्यकर्त्यांना महिला आर्थिक विकास महामंळातर्फे ‘पुरूष सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यात कणकवली तालुक्‍यातून मोरजकर यांना हा सन्मान मिळाला. पंचायत समितीच्या भालंचद्र महाराज सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, कृषी अधिकारी श्री. पवार, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या मुख्य सेविका हळदणेकर, श्रीमती नाईक, लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष उदयमती देसाई, सचिव शितल मांजरेकर आदी उपस्थित होते.
पुरूष सन्मान पुरस्कारासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्या निवड समितीने कणकवली तालुक्‍यातील २८ सामाजिक कार्यकर्त्यांची निवड केली होती. या सर्वांतून तीन नावे निश्‍चित करण्यात आली. यातील ऋषिकेश किशोर मोरजकर यांना तालुका पुरूष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. तर सूर्यकांत सखाराम ढवण (करुळ) आणि शैलेश कृष्णा तळेकर (कुर्ली वसाहत) यांची नावे जिल्‍हास्तरीय पुरूष सन्मान पुरस्कारासाठी निश्‍चित करण्यात आली. सीमा गावडे यांनी सूत्रसंचालन केले. भारती नारिंग्रेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT