कोकण

वैद्यकीय बिलांप्रकरणी आरोग्य सेवक निलंबित

CD

वैद्यकीय बिलांप्रकरणी
आरोग्य सेवक निलंबित
रत्नागिरी, ता. ६ ः कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैद्यकीय बिलांचे रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवल्याप्रकरणी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवकाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दुजोरा दिला.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांची वैद्यकिय देयके तपासणीची जबाबदारी जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत आरोग्य सेवकाकडे देण्यात आली होती. संबंधित कर्मचार्‍याने मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय देयके प्रलंबित ठेवल्याची बाब तसेच वैद्यकीय देयक वॉच नोंदवही ठेवली नव्हती. संबंधित टेबलच्या आरोग्य सेवकाला कामाचा निपटारा न केल्यामुळे निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी काढले. त्या कर्मचार्‍यावरील पुढील कारवाई सीईओंच्या आदेशाने केली जाणार असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT