कोकण

रत्नागिरी ः पोलिस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

CD

पोलिस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी, ता. ६ ः एका पोलिस कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. आता तो कर्मचारी शुद्धीवर आला आहे. आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण मात्र अजून स्पष्ट झाले नाही.
महेश कीर (वय ३०, रा. टीआरपी, रत्नागिरी) असे या पोलिसाचे नाव आहे. महेश कीर हे रत्नागिरीतील टीआरपी येथे वास्तव्यास असून, पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात कर्तव्याला आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महेश याने टीआरपी येथील घरी विषारी द्रव्य प्यायला. अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाइकांनी तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महेश याने अतिप्रमाणात विष प्राशन केल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, महेश याला रत्नागिरी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणीही त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले असून, तो शुद्धीवर आला आहे; मात्र महेश याने कोणत्या कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केला, हे समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

बायकोनं केलेला आरोप खरा ठरला? खरंच थलपती विजयचं अभिनेत्रीसोबत अफेअर? सोशल मीडियावर दोघांचा Viral Video

US Missile Test: ‘डुम्सडे मिसाईल’ची यशस्वी चाचणी; अमेरिकेकडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT