Uday Samant  sakal
कोकण

Uday Samant : हिंमत असेल तर अजित पवारांना गद्दार म्हणा

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील हे देखील तितकच सत्य आहे. कोणी कितीही आदळापट केली तरीदेखील त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गट आणि भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे आता शिंदे गटाला गद्दार म्हणणे अचानक बंद झाले आहे. त्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला डिवचले. हिंमत असेल तर अजित पवारांना गद्दार बोलून दाखवा.

अजित पवार आमच्यासोबत आल्यापासून गद्दार बोलणे बंद झाले आहे. मी अजितदादांचे त्याबद्धल आभार मानतो. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे काल काही लोक बुके घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते, असा टोलाही उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.

उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी इर्शाळगडावरील रेस्क्यू ऑपरेशनचीही माहिती दिली. सोमवारपासून इर्शाळगड येथील सर्च ऑपरेशन बंद करण्यात येणार आहे.

मात्र, स्थानिकांच्या पुनर्वसनाचं काम सुरू राहणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. हे लोक राज्य सरकारवर टीका करत आहेत. पण यांच्या टीकेत तथ्य नाही.

हे सरकार लोकांचे आहे, गतिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड येथे दीड तास पायी चालत गेले. त्यावर हे लोक काही बोलत नाही. अशी दुर्घटना घडली असती तर हे लोक पायी चालत गेले असते का? असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे. राज्य सरकार स्थिर आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील हे देखील तितकच सत्य आहे. कोणी कितीही आदळापट केली तरीदेखील त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

फडणवीस यांचे मन मोठे

देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन फार मोठे आहे. ही गोष्ट खरी आहे की, त्यांनीच शिफारस केली होती आणि त्यासाठी जर आरोप-प्रत्यारोप होत असेल तर त्याला काही अर्थ नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT