Talathi recruitment sakal
कोकण

Talathi Recruitment : सिंधुदुर्गातून तलाठी पदांसाठी २७,०७६ अर्ज

राज्याने जाहीर केलेल्या तलाठी रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आजपासून लेखी परीक्षा सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

ओरोस - राज्याने जाहीर केलेल्या तलाठी रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आजपासून लेखी परीक्षा सुरू झाली आहे. जिल्ह्यात १४३ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी तब्बल २७ हजार ७६ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने अराखिव जागेसाठी एक हजार रुपये आणि राखीव जागेसाठी ९०० रुपये शुल्क ठेवले होते. त्यामुळे जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रियेतून शासनाला २ कोटी रुपयांच्यावर एवढा महसूल प्राप्त झाला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने राज्यात ७५ हजार शासकीय पदे भरण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील महसूल विभागातील गट क प्रवर्गातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्यात सुरु झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी एकूण दहा लाख ४१ हजार ७१३ एवढे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी खुल्या प्रवर्गाकरिता एक हजार रुपये तर राखीव जागांसाठी ९०० रुपये शुल्क ठेवण्यात आले होते.

राज्यात दाखल अर्जांचा विचार केल्यास १०० कोटींच्यावर शुल्क महसूल स्वरूपात शासनाला प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात १४३ जागांसाठी २७ हजार ७६ अर्ज आल्याने दोन कोटींच्यावर महसूल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात १४३ जागांसाठी भरती होत असताना त्यातील ४६ जागा अराखिव राहिल्या आहेत.

परिक्षा केंद्र नसल्याने संताप

जिल्ह्यात २७ हजारापेक्षा जास्त अर्ज आलेले असताना जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले नाही. त्यामुळे उमेदवारांत तीव्र नाराजी आहे. मुंबई, कोल्हापूर येथे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवारांच्या खिशाला कात्री बसणार आहे. किमान एक ते दीड हजार रुपये अधिक खर्च सोसावा लागणार आहे.

आरक्षण असे -

अनुसूचित जाती - २०

अनुसूचित जमाती - ७

विमुक्त जाती 'अ' - ४

भटक्या जमाती 'ब' - ४

भटक्या जमाती 'क' - ६

भटक्या जमाती 'ड' - ३

विशेष मागास प्रवर्ग - २

इतर मागास प्रवर्ग - २९

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग - २२

आरक्षणानुसार भरल्या जाणाऱ्या जागा

सर्वसाधारण - ४०

महिला - ४२

खेळाडू - १३

माजी सैनिक - २१

प्रकल्पग्रस्त - ११

भूकंपग्रस्त - ४

दिव्यांग - ६

पदवीधर अंशकालीन - १२

अनाथ - १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT