कोकण

खऱ्या नागाच्या पूजनाचा तिराळीत योग

CD

24862
तिराळी ः येथे सदाशिव शेटवे यांच्या अंगणात आलेला नाग.

खऱ्या नागाच्या पूजनाचा तिराळीत योग

नागपंचमीदिनीच दर्शन; शेटवे कुटुंबीयांनी केली मनोभावे पूजा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २१ : नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. या दिवशी खऱ्याखुऱ्या नागाचे दर्शन होणे, हा योगायोग असतो; मात्र नागपंचमी दिवशी खऱ्या नागाचे पूजन करण्याचा योग तिराळी-शेटवेवाडी येथे आला. तेथील शेटवे कुटुंबीयांनी अंगणात आलेल्या नागाचे पूजन केले.
तालुक्यात आज नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. घरोघरी नागदेवतेची मूर्ती आणून पूजन करण्यात आले. दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तिराळी-शेटवेवाडी येथील सदाशिव शेटवे यांच्या अंगणात मात्र दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खऱ्या नागाचे दर्शन झाले. नागदेवतेचे अंगणात आगमन होताच शेटवे कुटुंब अचंबित झाले. नागाच्या जवळ जाण्यास कोणी धजावत नव्हते. यावेळी सर्पमित्र श्रीधर वेटे यांना बोलावण्यात आले. सर्पमित्र वेटे आल्यानंतर शेटवे कुटुंबीयांनी पुष्प वाहून आणि अक्षता टाकून नागाचे पूजन केले. त्याच्या समोर दुधाची वाटी देखील ठेवण्यात आली. सर्वांनी अंगणात प्रकटलेल्या नागाचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्पमित्र वेटे यांनी वन विभागाला कळवून त्या नागाला पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

Mahayuti Politics: महायुतीचा मास्टरस्ट्रोक! बंडखोरांना मोठी ऑफर; भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकं कोणतं आमिष दाखवलं?

SCROLL FOR NEXT