कोकण

ऐतिहासिक ''रेडे घुमट''ने घेतला मोकळा श्वास

CD

53326
बांदा ः रेडे घुमट येथे संवर्धन मोहिमेत सहभागी झालेले दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

ऐतिहासिक ‘रेडे घुमट’ने
घेतला मोकळा श्वास

‘दुर्ग मावळा’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः सोळाव्या शतकातील आदिलशाही राजवटीतील इतिहासाची साक्ष देणाऱ्या येथील रेडे घुमट परिसरात आज दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आज दिवसभर कित्येक टन कचरा गोळा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात घुमटावर वाढलेल्या जंगली झाडाझुडपांची तोड करण्यात आली. घुमटाची संवर्धन मोहीम राबविण्यात आल्याने या ऐतिहासिक वास्तूला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत रेडे घुमट संवर्धन मोहीम राबविण्यात आली होती. या संवर्धन मोहिमेत झुडपांनी अदृश्य झालेल्या या ऐतिहासिक वास्तूने मोकळा श्वास घेतला. पावसात पुन्हा एकदा घुमटाच्या आजूबाजूला झाडी वाढलेली होती. आज दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे आयोजित मोहिमेत पुन्हा एकदा स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत गणेश नाईक, प्रसाद सुतार, समील नाईक, शिवाजी परब, रोहन राऊळ, सच्चिदानंद राऊळ, शीतल नाईक, गार्गी नाईक, संजना मयेकर, प्रकाश कडव, विशाल परब, साईप्रसाद मसगे, अक्षय कविटकर, विजय धामापूरकर, प्रणिता मांडवकर, राहुल मांडवकर, ऋतुजा पटेकर, सानिया कुडतरकर, ऋतुराज सावंत, जे. डी. पाटील, नैतिक मोरजकर आदींनी सहभाग घेतला. या मोहिमेसाठी सुनील धोंड, सच्चिदानंद राऊळ व शंकर कोराणे यांनी झुडपे साफ करण्यासाठी सामग्री पुरविली. बांदा उपसरपंच जावेद खतीब, सचिन नाईक, जकाप्पा पाटील, नीलेश मोरजकर, यश माधव यांनी सहभागी मावळ्यांच्या नाश्त्याची सोय केली. लवकरच पुन्हा एकदा संवर्धन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT